Ladki Bahin Yojana : अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करा

Maharashtra Government Scheme : मुख्यमंत्री माझी, लाडकी बहीण योजना’ योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on

Washim News : ‘मुख्यमंत्री माझी, लाडकी बहीण योजना’ योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाकडे अर्ज द्यावा, असे आवाहन करीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीही सुरू केल्याची माहिती दिली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, सर्वांगीण विकासाच्या हेतूने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. या योजनेनुसार राज्य सरकारकडून २१ ते ६० वय असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र? दरमहा मिळणार १५०० रुपये

यासाठी संबंधित महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. संबंधित महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जनजागृती सुरू झाली.

जिल्ह्यातील पात्र महिलांना १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत आधार कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असल्याचा तहसीलदारांचा दाखला यांसह अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

Ladki Bahin Yojana
Interim Budget Maharashtra 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात 'लेक लाडकी योजने'साठी विशेष तरतूद?

..तर लाभार्थी अपात्र ठरेल

वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक.

कुटुंबात कोणी आयकरदाता असल्यास.

कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेकरिता पात्र महिलांनी अंगणवाडी सेविका अथवा ग्रामसेवक यांच्याकडे १ ते १५ जुलै दरम्यान अर्ज सादर करावेत.
वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com