Agriculture Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Seeds Conservation: देशी वाण संवर्धनासाठी ‘ज्ञानशक्ती’चा पुढाकार

Agriculture Innovation: नागरिकांचे आरोग्य टिकवणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे व पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन करणे या उद्देशाने ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’ संस्थेने पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Manchar News: नागरिकांचे आरोग्य टिकवणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे व पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन करणे या उद्देशाने ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पांतर्गत या उपक्रमाची सुरुवात आंबेगाव तालुक्यात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५० शेतकऱ्यांना देशी भाजीपाला व कडधान्यांच्या मोफत बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्याकडून उपलब्ध झालेले हे बियाणे शाश्‍वत शेतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याबाबत माहिती देताना ज्ञानशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सलमान शेख म्हणाले, ‘‘सध्या अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करीत आहेत.

यामुळे माणसांच्या आरोग्यावर तसेच जमिनीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी तरी दहा गुंठे क्षेत्रात रासायनिक मुक्त देशी वाणांची शेती करावी. याबाबत संस्थेमार्फत गावोगावी जनजागृती सुरू आहे.’’

या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२) नारायण तुळशीराम टाव्हरे (निरगुडसर), किसन नाथा लोंढे (एकलहरे), दिनेश शंकर भोर (शिंदेवाडी) व भाऊसाहेब कोंडाजी शिंदे (कारेगाव) या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर टाळून निसर्गाशी सुसंगत शेती पद्धती अंगीकारल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येतेच, पण आरोग्यदृष्ट्या सुरक्षित अन्नधान्य मिळवणे शक्य होते. यासाठी गावागावांमध्ये जनजागृती मोहिमा राबविण्यात येत आहेत.
रोहित थोरात, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था, मंचर
शेतकऱ्यांनी बियाण्यांसाठी मंचर (ता. आंबेगाव) येथील डीएसके प्राइड इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संस्थेच्या कार्यालयात, आयसीसीआय बँकेशेजारी संपर्क साधावा किंवा ९३५६१४१६७६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.
अपेक्षा वाघुले, देशी वाण जनजागृती प्रमुख ज्ञानशक्ती संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT