Illegal Seed Seized : पिंपळोद येथे ११ लाखांचा बियाणे साठा जप्त

Seed Black Market : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे ५० लाखांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त करण्यात आला.
Illegal Seed Seized
Illegal Seed Seized Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : चंद्रपूरबरोबरच आता अमरावती हे विदर्भातील अनधिकृत बियाणे पुरवठ्याचे केंद्र झाल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सुमारे ५० लाखांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त करण्यात आला. त्याच श्रृंखलेत अचलपूर कृषी उपविभागाअंतर्गत पिंपळोद येथील छापेमारीत ११ लाख ९८ हजारांचा बियाणे साठा आढळून आला.

विदर्भाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अमरावतीमधून विदर्भात सर्वदूर अनधिकृत बियाणे पोहोचविणे शक्‍य होते. त्यामुळेच अनधिकृत बियाणे तस्करांनी अमरावतीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. चंद्रपूर हे आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या सीमेवर आहे. परिणामी त्या राज्यांतून अनधिकृत बियाण्यांची खेप दरवर्षी विदर्भात दाखल होते.

Illegal Seed Seized
Illegal HTBT Seed : अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा मूर्तिजापूरमध्ये जप्त

यंदा मात्र त्या भागात कृषी विभागाच्या कारवायांची गती मंदावल्याने शंका व्यक्‍त होत आहे. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात मात्र कृषी विभागाने बियाणे तस्करांवर कारवाईला वेग दिला आहे. अशाच एका कारवाईत अचलपूर उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, दर्यापूर तालुका कृषी अधिकारी आरती साबळे, कृषी सहायक प्रशांत हाडोळे, आनंद गावंडे, अशोक मोहोरकार, किरण बोरेकर, वाहन चालक सचिन चवरे यांच्या पथकाने अनधिकृत बियाणे साठा जप्त केला.

Illegal Seed Seized
Illegal Seed Seized : अमरावतीत २५ लाखांचा अनधिकृत बियाणे साठा जप्त

पिंपळोद येथील प्रशांत नवलकार हे अनधिकृत बियाण्यांची साठवणूक व विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने त्यांच्या घर व गोदामाची झडती घेतली.

या वेळी त्यांच्या घर व गोदामात १३३० बियाणे पाकिटांचा साठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या बियाण्याची किंमत ११ लाख ९८ हजार ३३० रुपये आहे.

विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या कारवाईत ११ लाख ९८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. येवदा पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- प्रफुल्ल सातव, उपविभागीय कृषी अधिकारी, अचलपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com