Gokul Dudh Sangh agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, १०१ कोटी ३४ लाखांचा दिला फरक

Gokul Milk Rate : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) यंदा यंदा म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम म्हणून देण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Jhilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) यंदा यंदा म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम म्हणून देण्यात येणार आहे.

दरम्यान ही रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या बँकेतील खात्यावर २३ ऑक्टोबर २०२३ पासून जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दूधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दूधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०.५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत.

दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येणार असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

यावेळी डोंगळे म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दूधाकरीता २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रूपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ % प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ % प्रमाणे ७ कोटी १२ लाख ९५ हजार रूपये व शेअर्स भांडवलावरती ११% प्रमाणे डिव्हिडंड ६ कोटी ५० लाख ९२ हजार रूपये असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे.

दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे. अशी भावना चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केली. या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या जवळजवळ ५,२०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार असल्याची माहिती दिली.

गोकुळची सन २०२२-२३ मध्ये ३,४२९ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असून यामध्ये दूध उत्पादक, विक्रेते, ग्राहक व कर्मचाऱ्यांचा प्रामुख्याने सहभाग असल्याचे चेअरमन डोंगळे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT