Chh. Sambhajinagar News : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी (ता. १४) यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. या वेळी योजनेची कामे विहित कालावधीत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देविदास टेकाळे, मजीप्रचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री. देशमुख यांच्यासह सबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. पापळकर यांनी जायकवाडी धरणातील उद्भव विहिरीपासून (जॅकवेल) ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल, ॲप्रोच ब्रिज, फिल्टर प्लॅंट आदींसह सुरू असलेल्या कामाची पाहणी करून प्रत्येक कामाला काम पूर्ण करण्याबाबत विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
श्री. पापळकर म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलचे काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणे, २६ एमएलडीचा टप्पा जूनअखेर पूर्ण करणे, यासह कंत्राटदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार कंपनी आणि महापालिकेच्या सबंधित यंत्रणेने आपसात समन्वय ठेवत विहित कालमर्यादेत काम पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. महापालिका व कंपनीतर्फे करण्यात येणारी उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती घेतली. विहित कालमर्यादेत काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, २४ ठिकाणच्या जोडण्या पूर्ण करणे, ३० टाक्यांचे बांधकाम आणि वितरण व्यवस्था जोडणीचे काम मागे पडले आहे ते काम कंत्राटदाराने पूर्ण करण्याबाबतही
श्री. पापळकर यांनी सूचना केल्या. जायकवाडी धरणक्षेत्रातील जॅकवेल, चितेगाव येथे सुरू असलेले मुख्य जलवाहिनीचे काम, फारोळा येथील २६ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र, नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही त्यांनी जाणून घेतल्या.
उच्च न्यायालयात पाणीपुरवठा योजनेबाबत जनहित याचिका सुरू असून प्रशासनाकडून उच्च न्यायालयाला वेळेवेळी पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा दिला जातो. ११ जून रोजी याबाबतचा आढावा देण्यात आला. मुख्यमंत्री यांनीही मुंबई येथे नुकतीच पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक घेतली. यात छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करा असे निर्देश देण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.