Yeola Water Project : पाणी नाही... तहान आहे; आता टँकरमुक्तीकडे पाऊल!

Water Scarcity : ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कसं येणार?’ ही म्हण अक्षरशः अनुभवणारा येवला तालुका अनेक दशकांपासून पाण्याच्या टंचाईचा शाप भोगतोय. उ
Yeola Water Project
Yeola Water Project Agrowon
Published on
Updated on

Nashik News : ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कसं येणार?’ ही म्हण अक्षरशः अनुभवणारा येवला तालुका अनेक दशकांपासून पाण्याच्या टंचाईचा शाप भोगतोय. उन्हाळा आला की विहिरी कोरड्या, हातपंप निकामी, तलाव ओसाड, अन् टँकरच्या तोंडाकडे हवालदिल नजर! पण, आता टँकरच्या पाण्यावर वाढलेल्या दोन पिढ्यांना दिलासा देणारी, ‘पाणीदार’ भविष्य घडविणारी दोन महत्त्वाकांक्षी योजनांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

Yeola Water Project
Water Conservation Project : पाणी शेतातच मुरवणारा ‘जलतारा’

दोन महत्त्वाच्या योजना ‘आशेचा झरा’

राजापूर प्रादेशिक योजना (४१ गावे) आणि धुळगाव प्रादेशिक योजना (१७ गावे) मिळून एकूण ५८ गावांना स्वच्छ, शाश्वत आणि घरपोच नळपाणीपुरवठा करण्याचं भक्कम नियोजन अंतिम टप्प्यावर आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून साकार होत असलेल्या या योजनांमुळे येवला तालुक्याच्या दुष्काळी इतिहासावर कायमची जलरेषा उमटू शकते.

Yeola Water Project
Jayakwadi Water Project : विभागीय आयुक्तांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी

राजापूर योजना : १८८ कोटींचा पाण्याचा महाप्रकल्प

उगम : नांदूरमधमेश्वर धरण

६१ किमी पाइपलाईन : जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणार

१७० किमी गुरुत्ववाहिनी : प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविणार

६ झोनमध्ये पाणीवाटप : नियोजनबद्ध व नियमित पुरवठा

गावे : राजापूर, आहेरवाडी, कोळगाव, मातुलठाण, रहाडी आदी ४१ गावांचा समावेश

धुळगाव योजना : ७२.५९ कोटींचा दुसरा झरा

उगम : पालखेड कालव्यातून पिंप्री साठवण तलाव

पाणीसाठा : ७.५० द.ल.घ.फू.

७० किमी वाहिनीद्वारे पाणीपुरवठा

गावे : धुळगाव, पिंप्री, एरंडगाव, पुरणगाव, साताळी आदी

१७ गावांचा समावेश

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com