Banana CMV Agrowon
ॲग्रो विशेष

Banana CMV Disease : केळी सीएमव्हीबाबत जिल्हास्तरावर समिती

Banana Cucumber Mosaic : कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या (सीएमव्ही) कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Team Agrowon

Jalgaon News : कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या (सीएमव्ही) कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी फैजपूर (ता. यावल) परिसरातील केळी पिकावरील कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) बाधित क्षेत्राची नुकतीच पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.

या भेटीत त्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली व सीएमव्हीचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

हंबर्डी गावातील शेतकरी विलास चुडामण पाटील, न्हावी येथील शेतकरी सागर निळकंठ फिरके, निर्मला फिरके, आमोदा येथील शेतकरी दिलीप कोल्हे यांच्या केळी पिकाखालील बाधित क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

या क्षेत्रभेटीवेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावल तालुका कृषी अधिकारी बी. व्ही. वारे, उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

Banana Plantation : मृग बहर केळी लागवड ६० हजार हेक्टरवर

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील ८७९ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT