Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी योजनांचा सखोल आढावा

Ahilyanagar Collector : अहिल्यानगरला आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी विविध विभागांच्या योजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर सोमवारी (ता. १७) पहिल्यांदाच डॉ. पंकज आसिया यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. कृषी विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

अहिल्यानगरला आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी विविध विभागांच्या योजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. सोमवारी कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, विमा कपनीचे प्रतिनिधी विनायक दिक्षित, अतिरिक्त पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. आनंद चवई उपस्थित होते.

या वेळी सुधाकर बोराळे यांनी कृषी विभागाअंतर्गत यावर्षी राबविलेल्या विविध योजनांचा भौतिक व आर्थिक लक्षांक व त्याप्रमाणे केलेले साध्य याचे सादरीकरण केले. सदरील सादरीकरणामध्ये जिल्ह्याची भौगोलिक परिस्थती सिंचन क्षेत्र, खरीप व रब्बी पिक पध्दती, फळबाग क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम बागांची नोंदणी, स्मार्ट अंतर्गत प्रकल्प याविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजना व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघत सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत प्राप्त ८५ प्रस्तावास जिल्हास्तरीय समितीने मान्यता देण्यात आली.

खरीप हंगाम २०२५ साठी खतांचा साठा व बियाणे पुरवठा याबाबत काटेकोर नियोजन करुन शेतक­यांना वेळेत चांगल्या दर्जाचे व योग्य किंमतीत पुरवठा करणेबाबत सूचना दिल्या. तसेच बोगस खते, बियाणे व लिंकिंगबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कठोर कारवाई करणेबाबत आदेशित केले. डॉ. आसिया यांनी प्रक्रिया उद्योगामध्ये सहभाग वाढविण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT