Flood Management Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Management Plan : संभाव्य पूरस्थितीचा आराखडा करा

Disaster Management : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तालुका स्तरावरील यंत्रणा कार्यान्वित कराव्यात.

Team Agrowon

Sangli News : संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून तालुका स्तरावरील यंत्रणा कार्यान्वित कराव्यात. तसेच ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी येथे दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, की नालेसफाई, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, निवारा केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. धोक्याची सूचना देणारी यंत्रणा उभी करावी. संबंधित सर्व यंत्रणांचे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावेत.

याआधीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन संभाव्य पूरबाधित गावात मॉक ड्रिल्स घ्यावेत. संभाव्य पूरस्थितीत आपत्कालिन कक्ष, संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रूग्णवाहिका, मदत केंद्रे यासारख्या बाबींचा आराखडा तयार ठेवावा.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, की संभाव्य आपत्ती परिस्थितीत प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. पूरबाधित गावात उपाययोजना कराव्यात. संभाव्य पूरबाधित गावांची पाहणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Agroforestry Story: तेलंगणामधील एक सुखद अनुभव

Maharashtra Drought Situation: दुष्काळ चारा नियोजनाचा!

Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात

Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

SCROLL FOR NEXT