Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Spinning Mills : सांगलीत पाच सूतगिरण्यांवर जिल्हा बँकेची कारवाई, मालमत्ता विक्रीचा निर्णय

Sangli DCC Bank : संबंधित सूतगिरण्यांकडे तब्बल १३४.४२ कोटी रुपयांची केवळ मुदलाची थकबाकी असून त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वीची या सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांशी संबंधित असलेल्या पाच सूतगिरण्यांवर जिल्हा बॅँकेने थकित कर्ज वसुलीसाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बॅँकेने २० फेब्रुवारीपर्यंत निविदा मागवल्या आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंत निविदा उघडण्यात येणार आहेत.

संबंधित सूतगिरण्यांकडे तब्बल १३४.४२ कोटी रुपयांची केवळ मुदलाची थकबाकी असून त्यावरील व्याज वेगळे आहे. बँकेने यापूर्वीची या सूतगिरण्यांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यापैकी तीन सूतगिरण्या बॅँकेने खरेदी केल्या आहेत.

कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी (तासगाव), खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स (विटा), शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी (इस्लामपूर), प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रीज (इस्लामपूर) व विजयालक्ष्मी कॉटन मिल्स (आटपाडी) या सूतगिरण्यांच्या मालमत्ता विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत.

या सर्व सूतगिरण्यांकडे डिसेंबर २०२४ अखेर केवळ मुद्दलाची थकबाकी १३४.४२ कोटी आहे. यावरील थकित व्याजही कोट्यवधी रुपयांत आहे. या संस्थांच्या लिलावासाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहेत. २४ फेब्रुवारीला निविदा उघडल्या जाणार आहेत.

जिल्हा बॅंकेने सिक्युरिटायझेशन ॲक्ट अंतर्गत या सर्व सूतगिरण्या ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्याकडील थकबाकी कायम आहेत. बॅँकेने यापूर्वी या सर्व संस्थांचा लिलाव जाहीर केला होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यातील शेतकरी विणकरी, प्रतिबिंब मागासवर्गीय व विजयालक्ष्मी कॉटन मिल या तीन सूतगिरण्या जिल्हा बॅँकेने मार्च २०२० मध्ये खरेदी केल्या आहेत.

बॅँकेने खरेदी केलेल्या कर्जदार संस्थांची सात वर्षांत विल्हेवाट लावून कर्ज वसुली करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. या संस्था खरेदी करून मार्चमध्ये ५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या संस्थांकडील कर्ज वसुली कोणत्याही स्थितीत बॅँकेला करावी लागणार आहे.

कोणाकडे किती थकबाकी

(रक्कम कोटींत, डिसेंबर २०२४ अखेर मुद्दल)

स्वामी रामानंदभारती सहकरी सूतगिरणी तासगाव ४५.८१

खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स विटा १७.९९

शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी इस्लामपूर ४९.३१

प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रीज इस्लामपूर ७.५५

विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी १३.७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT