Crop Loan
Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : यवतमाळला ७५ हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

Team Agrowon

Crop Loan Update In Yavatmal : खरीप पीककर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७५ हजार शेतकऱ्यांच्या हातात पीककर्ज गेले आहे. यंदा मे महिन्यात ७२३ कोटींचे पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पीककर्ज वाटप ४२१ कोटींवर गेले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप करताना अडवणुकीचे धोरण कायम आहे. राष्ट्रीयीकृत बँका कासवगतीने पीककर्ज वाटप करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

आतापर्यंत ३६.१५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. त्यातही जिल्हा बँकेने तब्बल उद्दिष्टाच्या ६४.६३ टक्के पीककर्ज वाटप केल्याने पीककर्ज वाटपाची टक्केवारी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी नेहमीप्रमाणे संथच आहे.

राष्ट्रीयीकृत बँका अजूनही १९.४३ टक्क्यांवर आडून आहे. वेळेवर धावपळ होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांत सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे.

यंदा बँकांना दोन हजार दोनशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्हा बँकेने उद्दिष्टांच्या ६४ टक्के म्हणजे ५२ हजार १७८ सभासदांना ४२८ कोटी २९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेने केवळ १९.४३ टक्के कर्जवाटप केले. यात १७ हजार २८७ सभासद असून, त्यांना २१३ कोटी ४८ लाख रुपयांचे पीककर्ज दिले आहे. ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे.

‘मध्यवर्ती’च अव्वल

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वाटपात यंदाही भरारी घेतली आहे. बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या नेतृत्वात आतापर्यंत बँकेने ६४ टक्के पीककर्जाचे वाटप केले. येत्या काही दिवसांत जिल्हा बँकेचे कर्जवाटप शंभर टक्के होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT