Kharip Crop Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : शेतकऱ्यांना ९६ टक्के पीककर्जाचे वितरण

Kharif Season : खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून आतापर्यंत दोन लाख ५ हजार ४४४ सभासदांना एक हजार ९८७ कोटी ४७ लाख रुपये म्हणजेच ९६ टक्के पीककर्जाचे वितरण केले आले.

Team Agrowon

Pune News : खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून आतापर्यंत दोन लाख ५ हजार ४४४ सभासदांना एक हजार ९८७ कोटी ४७ लाख रुपये म्हणजेच ९६ टक्के पीककर्जाचे वितरण केले आले. यामध्ये सर्वाधिक वितरण शिरूर तालुक्यात झाले आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्हा बॅंकेने पीककर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तातडीने कर्ज दिले आहे. यंदा खरीप हंगामासाठी दोन हजार ४३ कोटी ४३ लाख रुपये वितरणाचे बॅंकेचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी खरिपासाठी ते एक हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीककर्ज वितरणात वाढ झाली आहे.

बँकेने तालुका व गावपातळीवरील शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा केला आहे. जिल्ह्यात बॅंकेच्या जवळपास २९४ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते. बँकेची खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद पीक कर्ज घेतात.

बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्का व्याज आकारले जाते. तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ११ टक्के दराने वितरण होते. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत हा कर्जपुरवठा सुरू राहणार आहे. त्यानंतर रब्बीसाठी कर्जपुरवठा करण्यात येईल.

‘पीडीसीसी’ची पीककर्ज वितरण स्थिती

तालुका---वितरित पीककर्ज (रुपये)

आंबेगाव---१५६ कोटी ३७ लाख ६७ हजार

बारामती---२४६ कोटी ३ लाख ५७ हजार

भोर---९६ कोटी ९० लाख २८ हजार

दौंड---२७३ कोटी ३८ लाख ९० हजार

हवेली---७३ कोटी ८३ लाख ६८ हजार

इंदापूर---१३४ कोटी ७१ लाख १३ हजार

जुन्नर---२३५ कोटी ११ लाख ७४ हजार

खेड---२१५ कोटी ६९ लाख ४४ हजार

मावळ---४७ कोटी ९८ लाख ९१ हजार

मुळशी---२७ कोटी ३६ लाख २१ हजार

पुरंदर---१८० कोटी ४८ लाख २४ हजार

शिरूर---२८४ कोटी २५ लाख ४० हजार

वेल्हा---१५ कोटी ३२ लाख ७७ हजार

एकूण---१९८७ कोटी ४७ लाख ९५ हजार

खरिपात चांगला पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कर्ज घेतले आहे. आतापर्यंत जवळपास ९६ टक्के पीककर्जाचे वितरण झाले आहे. येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत खरिपाचे पीककर्ज देण्यात येईल.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पीडीसीसी बॅंक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT