Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Control Board : प्रदूषण मंडळाच्या बडग्यामुळे साखर कारखान्यांची नाराजी

Sugar Factory Maharashtra : प्रदूषणाचे नियम पाळले जात नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

Team Agrowon

Pune News : प्रदूषणाचे नियम पाळले जात नसल्याचा ठपका ठेवत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे साखर उद्योगातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या सूत्रांनी सांगितले, की ऐन गाळप हंगामात सहकारातील १०६ साखर कारखान्यांपैकी ४५ कारखाने बंद ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे. असे झाल्यास गंभीर समस्या तयार होतील.

प्रदूषण नियंत्रणासाठी कोणताही साखर कारखाना विरोधात नाही. त्यासाठी महागडी प्रणाली बसवली जात आहे. चिमणीतून राख बाहेर पडू नये तसेच स्पेंट वॉशची समस्या उद्‍भवू नये याकरीता प्रत्येक कारखाना आपापल्या पातळीवर दक्षता घेतो आहे.

परंतु काही अपवादात्मक स्थितीत किंवा नैसर्गिक कारणांमुळे प्रदूषणाची समस्या उद्‍भवल्यास कारखान्यांना एकदम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे अयोग्य ठरते आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या प्रदूषण मंडळाच्या विभागीय प्रमुखांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे.

प्रदूषण अधिनियम १९८६ मधील पाचव्या कलमानुसार प्रदूषण नियमावलीचे पालन न करणाऱ्या साखर कारखान्यांना बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

राज्याच्या प्रदूषण मंडळाने त्याबाबत अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करावी, तसेच वीज मंडळाने देखील पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी, असे या पत्रात नमूद केले आहे.

राज्याच्या प्रदूषण मंडळाने संबंधित ४५ साखर कारखान्यांची तपासणी करावी व त्यांनी कामकाज बंद ठेवल्याची खात्री करावी. या कारखान्यांनी २०२३-२४ मधील गाळप हंगामात कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी व कारखाना प्रणाली चालू होणार नाही याची दक्षता घ्या.

त्याबाबत काय कार्यवाही केली याचा अहवाल केंद्रीय मंडळाला १० नोव्हेंबरपूर्वी पाठवा, अशी तंबी केंद्रीय मंडळाने राज्याच्या मंडळाला दिली आहे.

केंद्रीय प्रदूषण मंडळ पत्रात काय म्हणाले...

-प्रदूषणामुळे कारखाने बंद ठेवण्याचे आदेश

- ४५ साखर कारखाने बाजू मांडणार

- नियम पाळले जात असल्याचा कारखान्यांचा दावा

प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळण्याचा कठोर प्रयत्न सर्व साखर कारखान्यांचा असतो. मात्र काही त्रुटींवर बोट ठेवत एकदम टोकाची भूमिका घेऊ नये असे वाटते. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण नियंत्रणाची प्रणाली कारखाने बसवत असताना त्याचे कौतुक होत नाही. परंतु एखादी त्रुटी शोधून कारखान्यांना बदनाम करण्याची संधी शोधली जाते. याबाबत आम्ही दाद मागणार आहोत.
- पी. आर. पाटील, अध्यक्ष, साखर संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT