Mosambi Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Crop Disease : अति पाऊस, हवामान बदलामुळे मोसंबीवर रोगाचा प्रकोप

Mosambi Fungal Disease : मोसंबी पट्ट्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. हवामान बदलही झाला. त्यामुळे मोसंबी फळपिकावर फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला आहे.

Team Agrowon

Jalna News : मोसंबी पट्ट्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. हवामान बदलही झाला. त्यामुळे मोसंबी फळपिकावर फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला आहे. झाडावर त्याची लक्षणे स्पष्टपणे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाचा वापर करणे फायदेशीर ठरणार असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

मोसंबी संशोधन केंद्रातर्फे मंगळवारी (ता. १९) आयोजित प्रक्षेत्र भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. दीपक कच्छवे, मोसंबी उत्पादक परमेश्वर सावंत, सलीम नबी सय्यद, नितीन सोरमारे, जाकीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.पाटील म्हणाले, की मोसंबी पट्ट्यात अधिकचा पाऊस झाला.

हवामान बदलही झाला. परिणामी मोसंबी फळ पिकांवर मोठ्या प्रमाणावर फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगाचा प्रकोप झालेला आढळून येत आहे. मोसंबी पीक अती पाण्याला संवेदनशील आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी बागायतदारांनी मोसंबी झाडावर तसेच खोडावर व झाडाच्या खाली बोर्डो मिश्रणाची आळवणी करणे गरजेचे ठरणार आहे.

बहुतांशी ठिकाणी बागांमध्ये रोगकारक बुरशी सुप्तावस्थेत आहे. ओलसर वातावरणामुळे अथवा थंडीमुळे या बुरशीचे बीजाणू कार्यरत होऊन मोठ्या प्रमाणावर मोसंबी पिकाच्या खोडाद्वारे झाडावर पसरत आहे. झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे.

याकरिता सर्वच मोसंबी बागायतदारांनी सल्ल्यानुसार उपाययोजना केल्यास येणाऱ्या पुढील हंगामामध्ये बुरशींचे नियंत्रण हमखास होण्यास मदत होईल. तसेच मृगबहराच्या फळांची गळदेखील थांबविण्यास मदत होणार आहे. यावेळी परिसरातील मोसंबी बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT