Mosambi Farming : मोसंबीच्या फळगळीची कळ सोसता सोसवेना

Mosambi Fruit Issue : मराठवाड्यातील प्रमुख फळपीक असलेल्या मोसंबीची फळगळ थांबता थांबत नसल्याची स्थिती आहे.
Mosambi Farming
Mosambi FarmingAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील प्रमुख फळपीक असलेल्या मोसंबीची फळगळ थांबता थांबत नसल्याची स्थिती आहे. अलीकडच्या दोन-तीन वर्षांपासून वाढत चाललेली ही फळगळ थांबविण्यासाठी सुचविलेले उपायही उपयोगी पडत नसून निसर्गाची ही साथ मोसंबी उत्पादकांना मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्पादक कमालीचे हैराण झाले असून, फळगळीचे प्रमाण वाढत चालले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना हे दोन जिल्हे मोसंबीचे हब मानले जातात. या दोन जिल्ह्यांतच फळगळीचे प्रमाण वाढल्याने मोसंबी उत्पादक हैराण झाले आहेत. शास्त्रज्ञ सुचवीत असलेले उपाय करूनही फळगळ रोखली जात नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. कधी पाण्याअभावी तर कधी निसर्गाची प्रतिकूलता सेटिंग न होण्यास कारणीभूत ठरते. यासह इतर प्रश्‍न मोसंबी उत्पादकांना सातत्याने सतावत आहेत. यातून मार्ग काढला तर दराचा प्रश्‍न त्यांचे कंबरडे मोडण्यासाठी उभाच असतो. प्रचलित कीड रोगांच्या आक्रमणासोबतच आता पक्वतेला आलेली हिरवी फळे गळून जात असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याचा अनुभव मोसंबी उत्पादकांना येत आहे.

Mosambi Farming
Mosambi Orchard : कहाणी वाळलेल्या मोसंबी बागेची

फळ पिकांचे नेमके क्षेत्र किती?

मराठवाड्यात मोसंबी किंवा इतरही फळ पिकांचे नेमके क्षेत्र किती, त्यातील उत्पादनक्षम बागा किती हा प्रश्‍न अधांतरीच आहे. सारे काही अंदाजे सुरू असल्याने त्याचाही दरात उत्पादकांना फटका दरात बसत आहे. त्यामुळे कोणत्या फळ पिकांचे नेमके क्षेत्र किती, त्यातील उत्पादनक्षम बागा किती, उत्पादनक्षम बागांपैकी संकटामुळे तुटल्या किती, शिल्लक किती हे कळायला मार्ग नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी ही गणना झाली होती. आता याचा लेखाजोखा कृषी विभागाची यंत्रणा मांडणार केव्हा हा प्रश्‍न आहे.

Mosambi Farming
Mosambi Management : शास्त्रीय व्यवस्थापनानेच मोसंबीमध्ये परिवर्तन शक्य
मोसंबी पट्ट्यात मागील १०-१२ दिवसांपासून रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान अन् सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदगतीने सुरू आहे. फळांमधे कर्बोदके, संजीवके आदींसाठी स्पर्धा निर्माण झाल्याने अन् किडी -रोगांसाठी अनुकूल वातावरणामुळे फळगळ सुरू आहे. पुरेशी उघडीप अन् सूर्यप्रकाश मिळाल्यास नक्कीच फळगळ रोखण्यास मदत मिळेल.
डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर, जि. जालना
शास्त्रज्ञांनी सुचविलेले फळगळीचे उपाय दोन तीन वेळा करून पाहिले पण उपयोग नाही. फळगळ वाढतच चालली आहे. परिसरात २० ते २२ टक्के फळगळ होत आहे.
बाबासाहेब पडूळ, मोसंबी उत्पादक, लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर
पाण्याचा प्रश्‍न, दराचा प्रश्‍न, सेटिंग, फळगळ सारे प्रश्‍न कायम आहेत. त्यामुळे ते सुटण्यासाठी संशोधन किंवा प्रशासकीय नियोजन कोण करणार हा प्रश्‍न आहे.
रमेश धांडगे, राहेरा, ता. घनसावंगी, जि. जालना
दोन-तीन वर्षांपासून फळगळीने हैरान आहोत. यंदा फळगळ वाढत जाण्याची भीती आहे. शास्त्रज्ञांचे उपाय आम्हा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत.
बद्रीनाथ पाचोडे, दिनायतपूर, ता. पैठण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com