Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Disease : भातावर बगळ्या, तर नागलीवर करप्याचा प्रादुर्भाव

Ragi Disease : तालुक्यातील खरीप हंगामातील भात, नागली आणि वरई या मुख्य नगदी पिकांना पावसाची उत्तम साथ मिळाली.

Team Agrowon

Mokhada News : तालुक्यातील खरीप हंगामातील भात, नागली आणि वरई या मुख्य नगदी पिकांना पावसाची उत्तम साथ मिळाली. आता पिके बहरून गोंडे (लोंबे) बाहेर टाकत असताना भातपिकावर बगळ्या, तर नागलीवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उभी पिके करपून गेली आहेत. हातातोंडाशी आलेले पीक हातून जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात खरिपाचे १२ हजार ७५९ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये नागली चार हजार ३२२ हेक्टर, वरई तीन हजार ८८५ आणि भाताचे दोन हजार १५ हेक्टर क्षेत्र आहे. या मुख्य नगदी तृणधान्य पिकाचे एकूण १० हजार २२३ हेक्टर क्षेत्र आहे. त्या खालोखाल उडीद, कुळीद, तूर या कडधान्याचे एक हजार ७८८ हेक्टर क्षेत्र आहे. भुईमूग, सूर्यफूल, खुरासणी आणि तीळ या गळीत धान्याची ७४७ हेक्टर क्षेत्रावर मोखाड्यात यंदाच्या पावसाळ्यात शेती करण्यात आली आहे.

यंदा खरीप हंगामाला उपयुक्त पाऊस बरसल्याने पेरणी आणि लावणीची कामे वेळेत झाली. त्यानंतर उत्तम पाऊस झाल्याने शेती बहरली आहे. गणेशोत्सवानंतर हळवी पिके गोंडा बाहेर टाकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला होता, मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही. गोंडा बाहेर टाकलेल्या भातपिकांवर बगळ्या, तर नागलीवर करप्या रोगाने घाला घातला आहे.

पंचनामे करण्याची मागणी

पिकांवरील झालेल्या रोगाची छायाचित्रे कृषी अधिकाऱ्यांना उमाकांत हमरे या शेतकऱ्याने दाखवली. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, तसेच मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याची आणि भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.

लष्करी अळी, पाने खाणारी अळीच्या बंदोबस्तासाठी १० लिटर पाण्यात सायपरमेथ्रीन चार मिली, तसेच मावा फवारावा. या किडीसाठी, रोगासाठी डायमेथोएट ३० ईसी १० मिली प्रति दहा लिटर पाण्यात, तसेच मोनोक्रोटोफास ३६ हे ६ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी, तसेच करपा, तांबेरा आणि बगळ्या रोगासाठी कार्बन डेझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे.
- आकाश सोळुंखे, मंडळ कृषी अधिकारी, मोखाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT