
Kolhapur News : जिल्ह्यात रविवारी (ता. २७) पावसाचा जोर शनिवारीच्या तुलनेत काहीसा ओसरला. पश्चिमेकडील भाग वगळता बहुतांश ठिकाणी ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने नद्यांच्या पातळीत वाढ कायम होती.
जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सात मालमत्तांचे सुमारे एक लाख ९८ हजारांचे नुकसान झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ४३२ मालमत्तांचे सुमारे एक कोटी ५५ लाख ३३ हजार ९५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या ६१ झाली आहे. कुंभी नदीला पूर आल्यामुळे पळसंबे, शेणवडे, मांडुकली आणि वेतवडे येथील बंधारे जलमय झाले आहेत. टेकवाडी-वेतवडे मार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, वेतवडे व बालेवाडी या गावांची वाहतूक मणदूर पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे.
गगनबावडा, असळज, बोरबेट, लखमापूर तसेच करूळ-भुईबावडा घाटमाथा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागात जोरदार सरी कोसळत राहिल्याने पिकांना फायदा झाला आहे. तर काही ठिकाणी नुकसानही झाल्याची नोंद आहे.
कोदेमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
कोदे धरण क्षेत्रात सर्वाधिक १६० मिमी पावसाची नोंद झाली असून, तिथून ८१८ क्युसेक विसर्ग सरस्वती नदीपात्रात सुरू आहे. कुंभी मध्यम प्रकल्प ८५ टक्के भरला आहे.
धरण क्षेत्रात अतिवृष्टी, नद्यांना पूर
राधानगरी, दुधगंगा, कडवी, कासारी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, जंगमहट्टी, जांबरे, घटप्रभा, सर्फनाला, धामणी आणि कोदे या धरण क्षेत्रांत गेल्या २४ तासांत अतिवृष्टी झाली. यामुळे पंचगंगा नदीची पातळी तब्बल साडेचार फुटांनी वाढली. शनिवारी दुपारी राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला होता.
धरणांमधील स्थिती
आलमट्टी धरण ः ८०.६९% भरले असून, विसर्ग ८०,००० क्युसेक कोयना धरण ः ७७.७९% भरले, विसर्ग २१०० क्युसेक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.