Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनी कालव्यासह भीमा-सीना जोड बोगद्यातून विसर्ग

Ujani Dam Water Level : उजनीच्या कालव्यात व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. कालव्यातून एक हजार तर बोगद्यातून दोनशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

Team Agrowon

Solapur News : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार शनिवारपासून (ता. ४) उजनीच्या कालव्यात व भीमा-सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. कालव्यातून एक हजार तर बोगद्यातून दोनशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला, रब्बी हंगामातही पेरण्यांचा टक्का घटला आहे. ऊस, फळबागा, चारा पिके यासह शेती व पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्याची मागणी सातत्याने होत होती.

त्यानुसार, उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सध्या एक हजार क्युसेकने पाणी सोडले जात असून हा विसर्ग तीन हजारांवर नेला जाणार आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सध्या दोनशे क्युसेकने पाणी सोडले जात असून हा विसर्ग नऊशेपर्यंत नेला जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

उजनीतून कालव्यात जवळपास आठ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. बोगद्यातून साडेतीन ते चार टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. उजनीत सध्या ५४ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.

डिसेंबरमध्ये उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. यंदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा अशी अपेक्षा सर्वच स्तरामधून व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT