Koyna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Rain Update : साताऱ्यातील सहा धरणांतून ५८ हजार क्युसेकने विसर्ग

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी पाण्याच्या आवके इतकाच विसर्ग सुरू ठेवला आहे.

जिल्ह्यातील कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना ९२, नवजा १५८, महाबळेश्‍वर १०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणात ४२,७८७ क्युसके पाण्याची प्रतिसेकंद आवक होत आहे. कोयना धरणात सकाळी आठपर्यंत ८५.५९ टीएमसी (८१.३२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी पाण्याच्या आवके इतकाच विसर्ग सुरू ठेवला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावर ४० हजार व पायथा वीजगृहात २१००, असा एकूण ४२,१०० क्युसेक नदी पात्रात सोडले जात आहे.

तसेच धोम ३६२२, धोम-बलकवडी १२४५, कण्हेर ७४२५, उरमोडी ५००, तारळी ३५२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सर्व नद्यांच्या माध्यमातून कृष्णा नदी पात्रात होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी.

कोयना ८५.२३ (८०.९७), धोम ११.३८ (८४.३०), धोम - बलकवडी ३.४३ (८४.७), कण्हेर ८.६ (७९.८०), उरमोडी ७.७१ (७७.४१), तारळी ५.५ (८६.३२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT