Monsoon Delay Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Update Solapur : ‘मृग’नंतर ‘आर्द्रा’नेही केली निराशा

Kharif Season 2025 : यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर पाठोपाठ आर्द्रा नक्षत्रातील पावसानेही निराशा केली आहे. आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन उद्या (रविवार, ता. २९) एक आठवडा होत आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रानंतर पाठोपाठ आर्द्रा नक्षत्रातील पावसानेही निराशा केली आहे. आर्द्रा नक्षत्र सुरू होऊन उद्या (रविवार, ता. २९) एक आठवडा होत आहे. आठवड्यात सोलापूरच्या वातावरणात फारसा काही बदल झालेला नाही. उन्हाळ्याप्रमाणे उन आणि उकाडा जाणवू लागला आहे. मे मध्ये धो-धो पडलेला पाऊस जूनमध्ये गायब झाला असल्याची स्थिती सध्या जिल्ह्यात आहे.

जून महिन्यातील २६ दिवसात पावसाचे सरासरी दिवस ८ ठरले आहेत. या आठ दिवसात किरकोळ व रिमझिम पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीला, खरिपाच्या पेरण्यांसाठी आवश्‍यक असलेल्या पोषक वातावरणाला फार काही मदत झाली नाही. पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढला होता.

उजनीचा पाणीसाठा जवळपास ७७ टक्क्यांच्या आसपास गेला होता. आषाढी वारी दरम्यान उजनीत पाणी वाढल्यास जास्त पाऊस सुरू झाल्यास पूरस्थिती होऊ नये यासाठी उजनीत ६५ ते ७० टक्क्यांच्या दरम्यानच पाणीसाठा ठेवला जात आहे. त्यामुळे भीमा नदी, कालवा, बोगदा यासह अन्य योजनातून पाणी सोडले जात आहे.

आज सोलापुरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज सोलापुरात ६४ टक्के आर्द्रता होती. नेहमीच्या तुलनेत आज तापमानाचा पारा वाढला होता. सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यात रिमझिम पाऊस लावत आहे.

या पावसात काहीच जोर नसल्याने या पावसाचा शेतीसाठी फारसा उपयोग नसल्याने मुसळधार पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारपासून (ता. ५) सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश होत आहे. या प्रवेशाचे वाहन घोडा आहे. या नक्षत्रातील पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरासरीच्या ६१ टक्केच पाऊस

जून महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरी १०२.५ मिलिमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात सरासरी ६३.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या ६१.८ टक्केच पाऊस झाला आहे. जूनच्या २६ दिवसातील पावसाचे सरासरी दिवस ८ ठरले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक १६.३ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद १३ जून रोजी झाली आहे. उर्वरित दिवसांमध्ये सरासरी पाऊस १० मिलिमीटरच्याही आत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT