Sangli Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर पेरा

Kharif Season : पेरणीसाठी शेत तयार करण्याच्या नियोजनात असतानाच पावसाने दमदार सुरवात केल्याने शेतकऱ्यांना नियोजनात मोठा बदल करावा.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला गती आली आहे. जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ३७५ हेक्टर म्हणजे साठ टक्के पेरणी आटोपली आहे. त्याचबरोबर आडसाली हंगामातील उसाची लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करु लागला आहे. जत तालुक्यात सर्वाधिक तर खानापूर तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

जिल्‍ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह बागायती पट्ट्यातही मे च्या उत्तरार्धात मॉन्सून पूर्वपावसाने हजेरी लावली. पेरणीसाठी शेत तयार करण्याच्या नियोजनात असतानाच पावसाने दमदार सुरवात केल्याने शेतकऱ्यांना नियोजनात मोठा बदल करावा. प्रत्येक वर्षी पावसाअभावी लांबणाऱ्या पेरण्या यंदा मुदतपूर्व पावसाने लांबल्याने खरीप हंगामाचे चित्र पालटून गेले. पावसाळा सुरु होण्याआधीच मॉन्सूनच पूर्व पावसामुळे सर्वच पेरणीला गती आली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing: पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या २७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर इतके आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ८४ हजार ८३६ हेक्टरवर पेरा झाला होता. गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे पेरणीला गती आली आहे. गत आठ दिवसात ६२ हजार ५३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजमितीस १ लाख ४७ हजार ३७५ हेक्टर म्हणजे ५९ टक्के पेरा झाला आहे. उडीद, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

दरम्यान, अद्यापही काही सखल भागातील शेतात वाफसा नाही. त्यामुळे काही अंशी पेरण्याही रखडल्या आहेत. जिल्ह्यात आडसाली हंगामातील उसाची लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करु लागला आहे. सद्यस्थितीला जत, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात उसाची लागवड झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक तर खानापूर तालुक्यात सर्वात कमी पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing Marathwada : मराठवाड्यात ३४ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणी

धूळवाफ भागत पेरणीची परंपरा प्रथमच खंडित

रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे मेच्य शेवटच्या आठवड्यात नांगरट,कुळवणी करून धूळवाफ पाभरी, कुरी, बांडग्याच्या साह्याने कोरड्या मातीत पेरणी करतात या पद्धतीत हळव्या वाणांचा वापर होतो. यावर्षी पावसाने शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या धुळवाफ पेरणीची परंपरा या वर्षी प्रथमच खंडित झाली आहे. धूळवाफ पेरण्या झालेल्या नाहीत त्यांना रोप लावण करावी लागणार आहे.

पीक क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भात ३४६४

ख. ज्वारी ८०१२

बाजरी ३९९८०

मका ३२७८०

सोयाबीन १८४४९

भुईमूग १५२४३

जिल्ह्यातील तालुकानिहाय १ जून ते २७ जून अखेर झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

तालुका पाऊस पावसाचे दिवस

मिरज १०४.४ १४

जत ८१.९ ३

खानापूर-विटा ८५.३ १०

वाळवा-इस्लामपूर १८३.६ १९

तासगाव ९८.३ १२

शिराळा ३८४.९ २१

आटपाडी ८२.५ ९

कवठेमहांकाळ ८०.२ १२

पलूस १५७.३ १३

कडेगाव १३३.६ ११

एकूण १४०.४

जिल्हयात यंदाच्या खरिपात २ लाख ४६ हजार ११८ हेकटर वर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. डी. ए. पी खताचा तुटवडा नाही. काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा विक्रेते प्रयत्न करत आहे. दुकानांना भेटी देऊन वस्तुस्थितीची माहिती घेतली जात आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पावती घ्यावी. उगवणीच्या काही तक्रारी आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
विवेक कुंभार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com