Nashik APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC : अविश्वास ठराव मंजुरीनंतर संचालक पुन्हा परदेशवारीला

APMC, Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याविरोधात संचालक मंडळाने अविश्वास ठराव मांडला व तो मंजूर झाला.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्याविरोधात संचालक मंडळाने अविश्वास ठराव मांडला व तो मंजूर झाला. या सर्व हालचाली सुरू झाल्यानंतर अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर माजी सभापती शिवाजी चुंभळे गटात दाखल झालेले १० संचालक परदेशवारी करून आले.

तर आता अविश्वास ठराव मंजुरीनंतरदेखील खबरदारीचा उपाय म्हणून काही संचालक पुन्हा परदेशवारीला गेले असल्याचे समजते. बुधवारी (ता. १९) सभापती निवडीच्या दिवशीच नाशिकमध्ये हे संचालक थेट सभागृहात दाखल होणार असल्याचे समजते.

नाशिक बाजार समितीत काही दिवसांपासून सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. विद्यमान १८ पैकी १५ संचालक सभापतींच्या विरोधात आहेत, केवळ दोन संचालक पिंगळे यांच्यासमवेत आहेत. अविश्वास प्रस्तावही पोलिस बंदोबस्तात सादर करण्यात आला होता. त्यानंतर बाजार समिती सभागृहात संचालकांच्या बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. आता सभापती निवड काही तासांवर येऊन ठेपली आहे.

तत्पूर्वी, मावळते सभापती पिंगळे गटाकडून कोणतेही राजकारण होऊ नये, यासाठी शिवाजी चुंभळे गटाकडून कडेकोट असा बंदोबस्त केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संचालकांशी कुणीही संपर्क साधू नये, यासाठी पुन्हा एकदा काही संचालक परदेशवारीवर गेले आहेत. आता रंगपंचमीच्या दिवशी सभापतिपदाचा गुलाल कोणावर पडतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष

मावळते सभापती देवीदास पिंगळे हुकूमशाही पद्धतीने कामकाज करीत असल्याचा आरोप माजी सभापती शिवाजी चुंभळे, विद्यमान उपसभापती विनायक माळेकर, ज्येष्ठ संचालक संपतराव सकाळे यांच्यासह इतर संचालकांनी केला आहे. या सर्व घडामोडींना राजकीय किनार असल्याचेही बोलले जात आहे. आगामी काळात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शीतयुद्ध पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अजित पवार यांच्या पक्षातील काही संचालक सभापती पिंगळे विरोधात गेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

Livestock Breeding Policy: महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण : क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना

Soil Testing Technology: सेन्सर-आधारित मृदा आरोग्य परीक्षण

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

SCROLL FOR NEXT