Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

Digital Land Survey : राज्यात १० हजार मोजणीदार पॅनेलवर घेण्यात येत आहेत. मोठ्या तालुक्याला १००, मध्यम तालुक्याला ५० तर लहान तालुक्याला २५ खासगी मोजणीदार देण्याचे प्रस्तावित आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता. २५) येथे केले.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग बाबत आयोजित भूसंपादन कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात श्री. दिवसे बोलत होते. या वेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

श्री. दिवसे म्हणाले, की महामार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे आहे. शक्तिपीठ महामार्गाची मोजणी अचूक व्हावी यासाठी गतीने सीमांकन करावे, मोणार्कने मोजणी केल्यास ते आपण डिजिटलही पाहू शकतो सोबत विभागामार्फत ही मोजणी तपासता येणार आहे.

राज्यात १० हजार मोजणीदार पॅनेलवर घेण्यात येत आहेत. मोठ्या तालुक्याला १००, मध्यम तालुक्याला ५० तर लहान तालुक्याला २५ खासगी मोजणीदार देण्याचे प्रस्तावित आहे. तात्पुरत्या कच्च्या रेखांकनाची तरतूद करून त्याप्रमाणे काम केल्यास सुलभ होणार आहे.

१ कोटी ४० लाख नकाशे असून सर्व नकाशे डिजिटल स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे नकाशे उपलब्ध आहेfत. भूमी अभिलेख विभागात मागील २५ वर्षांत वेगाने तांत्रिक बदल झाले आहेत.

मोजणीमध्ये, डिजिटायझेशन, ई-गव्हर्नस सातबारा, नकाशा आणि मोजणी असे बदल करण्यात आले असल्याचे श्री. दिवसे म्हणाले. या वेळी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT