Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Weather : तापमानातील चढउतार अडचणीचा

Weather Report : फेब्रुवारीत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आत होते. मात्र त्यानंतर वाढ होऊन ते १६ अंशांपर्यंत गेले होते.

Team Agrowon

Nashik News : फेब्रुवारीच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मात्र पुन्हा त्यात चढ-उतार दिसून आले. फेब्रुवारीत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आत होते. मात्र त्यानंतर वाढ होऊन ते १६ अंशांपर्यंत गेले होते.

मात्र पुन्हा फेब्रुवारीअखेर पुन्हा नीचांकी ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या पद्धतीने मार्चमध्ये सुरुवातीपासून पुन्हा अस्थिरता दिसून आली. गुरुवारी (ता. ७) निफाड कृषी संशोधन केंद्रावर कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान ९ अंश नोंदविले गेले आहे.

मार्चच्या पहिल्या सप्ताहात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसवर गेले. तर किमान तापमान ६ अंशांवर आले. परिणामी तापमानातील चढ-उतार व पडणारे दव द्राक्ष पिकासाठी अपायकारक ठरले आहे. सध्या द्राक्ष खुड्यांना वेग आला आहे. मात्र साखर उतरलेल्या बागेत थंडीमुळे तडे जाण्याची स्थिती निफाड व चांदवड तालुक्यात दिसून आली.

हवामान उष्ण राहण्याची शक्यता

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ८ ते १२ मार्च दरम्यानचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व थोडे उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहील. कमाल तापमान ३४-३७ अंश सेल्सिअस व किमान तापमान १८-१९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग ९-१२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यांत झालेली तापमानाची नोंद

तारीख कमाल किमान

१ मार्च ३४.६ १५.५६

२ मार्च ३४.८ १५

३ मार्च ३२.१ १६

४ मार्च २८ ८.२

५ मार्च ३० ६.६

६ मार्च ३३ ९.८

७ मार्च ३२.८ ९

रंगीत द्राक्षाच्या वाणात तडे जाण्याची शक्यता संभावते. यासह सफेद द्राक्ष मण्यांची साखर १८ ब्रिक्सवर आहे, अशा बागेतही तडे जाण्याची समस्या होती. तर उशिराच्या गहू पिकाला या थंडीचा फायदा आहे. भाजीपाला पिकांना अडचण नाही. मात्र काही ठिकाणी दव पडल्यानंतर किंवा आर्द्रता वाढल्यास करपा रोग प्रादुर्भाव शक्यता आहे. त्यामुळे शिफारशीनुसार फवारणी करावी.
डॉ. राकेश सोनवणे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT