Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : आर्द्रतेचा हमीभावाने सोयाबीन खरेदीत खोडा

Soybean Rate : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत किमान आधारभूत किंमत दराने (एमएसपी ःप्रतिक्विंटल ४८९२ रुपये) सोयाबीन खरेदीसाठी १९ केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत किमान आधारभूत किंमत दराने (एमएसपी ःप्रतिक्विंटल ४८९२ रुपये) सोयाबीन खरेदीसाठी १९ केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. परंतु सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असल्यामुळे हमीभाव खरेदीत खोडा निर्माण झाला आहे.

शुक्रवार (ता. ८) पर्यंत ११ हजार २० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु केवळ ८ केंद्रांवर २२० शेतकऱ्यांच्या ३ हजार ४५३.९८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबरपासून शेतकरी नोंदणी तर मंगळवार (ता. १५)पासून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी शुक्रवार (ता. ८) अखेर ६ हजार ७१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

त्यापैकी परभणी, पेडगाव, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा येथील खरेदी केंद्रांवर सोयाबीन घेऊन येण्यासाठी नोंदणीकृत ६६३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. परभणी, पेडगाव, पूर्णा या ३ खरेदी केंद्रांवर ८१ शेतकऱ्यांचे १ हजार २६४.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्यातर्फे सोयाबीन खरेदीसाठी हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द या १० खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. ८)पर्यंत ४ हजार ३०७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ९ केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येण्यासाठी १ हजार २३५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले.

१२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचे सोयाबीन आणावे...

हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेले तसेच एफएकक्यू दर्जाचे सोयाबीन खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन परभणी-हिंगोली जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT