Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Importance : पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व

Team Agrowon

सचिन अवचार

Dietary Importance of Nutritious Cereals : राज्यात ज्वारी, बाजरी, राळा आणि नाचणी या पिकांची पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कमी पाण्यावर येणारे आणि स्थानिक हवामान स्थितीसोबत जुळवून घेण्याची क्षमता असल्याने या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

ग्रामीण भागात आजही दैनंदिन आहारामध्ये या तृणधान्यांचा उपयोग केला जातो. यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी यांचा समावेश होतो. या तृणधान्यांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असणारी विविध पोषकतत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

थंडीच्या दिवसांमध्ये बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे अधिकची ऊर्जा शरिरास मिळते. पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश केल्यास मधुमेह, बद्धकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो.

तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा अवश्य समावेश करावा.

ज्वारी

ज्वारीमध्ये विविध पोषकघटक असतात. प्रामुख्याने लोह, फॉस्फरस, पोटॅशिअम तसेच जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

हाडांच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

बाजरी

बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारखी पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

बाजरी ग्लुटेनमुक्त असून त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी बाजरीचे सेवन फायदेशीर ठरते.

बाजरीमध्ये अण्टिऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात. मधुमेह, हृदयरोग आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी बाजरी गुणकारी ठरते.

बाजरीमध्ये सल्फरयुक्त अमिनो आम्ल असल्याने लहान मुले व गर्भवती महिलांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे.

थंडीच्या दिवसांत बाजरीचा दैनंदिन आहारात अवश्य समावेश करावा. त्यामुळे जास्तीची ऊर्जा मिळण्यास मदत होते.

बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त मानली जाते.

हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी बाजरी उत्तम पर्याय आहे.

बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.

हाडांच्या मजबुतीसाठी बाजरीचे सेवन फायदेशीर ठरते.

राळा

राळा रंगाने पिवळसर असून आकाराने एकदम लहान असते.

राळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे नियमित आहारात राळ्याचा समावेश होणे गरजेचे आहे.

राळ्याचा ग्लायसेनिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी राळ्याचे सेवन करणे गुणकारी ठरते.

राळ्यामधे अँटीऑक्सिडंट गुणधर्म जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

राळा हे ग्लुटेनमुक्त असल्याने पचायला हलकी असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते.

नाचणी

नाचणीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, लोह, जस्त आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

ग्लुटेनमुक्त आहारासाठी नाचणी हा एक उत्तम पर्याय आहे.

वजन कमी करण्यासाठी नाचणी हे एक उत्कृष्ट अन्न आहे.

त्वचा, केसांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक नाचणीमध्ये असतात.

गर्भवती मातांसाठी नाचणी उत्तम आहार आहे.

कोलेस्ट्रॉलची पातणी नियंत्रित करणे, ह्रदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

नाचणीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

सचिन अवचार, ९१५६४६७१०६

(संशोधक विद्यार्थी, आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन, सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT