Uddhav Thackeray Agrowon
ॲग्रो विशेष

Uddhav Thackeray : मोदी-शहांसाठी आचारसंहितेचे नियम बदललेत काय? उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Swapnil Shinde

Election Commission Code of Conduct : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुक प्रचारात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला मतदान केले तर रामलल्लाच्या दर्शनासाठी मोफत अध्योध्यावारी घडवली जाणार आहे, असे आमिष मतदारांना दाखवले. निवडणूक आचारसंहिता असताना मतदारांना अशी ऑफर देणं, आमिष दाखवणे हे कायद्यात बसतं का? आता नियम बदलले आहेत का? असे सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. ठाकरे म्हणाले, 1987 मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून तत्कालीन निवडणूक आयोगाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सध्या भाजपकडून 5 राज्यांतील विधानसभांच्या निवडणूक प्रचारात धर्माच्या आधावर मते मागितली जात आहेत.

निवडणूक आयोगाकडून भाजपच्या विरोधातील पक्षातील नेत्यांना नोटीस पाठविली जात आहे. मात्र, भाजपवर कोणतीही काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याच मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने आपल्या नियमांमध्ये बदल केला आहेत का? असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT