Sugarcane FRP : मुद्दा ऊसदराचा! राजू शेट्टी, फडणवीसांचा ताफा अडवणार; चक्का जाम करण्याचाही इशारा

Swabhimani Shetkari Saghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मागच्या कित्येक दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून जोरदार आंदोलन सुरू आहे.
Sugarcane FRP Raju Shetti
Sugarcane FRP Raju Shettiagrowon
Published on
Updated on

Sugarcane Protest Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मागच्या कित्येक दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरातील हुपरी येथील हुतात्मा स्मारक मैदानावर सभा घेतली. यावेळी शेट्टी यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कारखानदार आणि सरकारला दिला.

शेट्टी म्हणाले की, आम्ही आमच्या हक्काचे दाम मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवाय साखर कारखानदारांनादेखील स्वस्थ बसू देणार नाही. आज(ता. १६)कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ऊस दराचा हिशोब मांडणार आहे.

त्यावर तोडगा जर नाही निघाला तर उद्या(१७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कोल्हापूर विमानतळावरच घेराव घालण्याचा इशारा दिला. तसेच रविवारी (ता.१९) राष्ट्रीय महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शांततेच्या मार्गाने गेले दीड महिना झाले ऊस आंदोलन सुरू आहे,. पण याविषयी सत्ताधारीच काय? विरोधी पक्षातील नेतेसुद्धा एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामागे त्या सर्वांचे साखर कारखाने आहेत हे कारण आहे, असे सांगून कारखान्यात केलेली गैरकृत्ये बाहेर पडू नयेत. यासाठी ईडीच्या कारवाईच्या भीतीने इकडे तिकडे उंदरासारखे हे नेते पळत सुटले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. एकमेव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अपवाद आहे. कारण त्यांच्याकडे साखर कारखाने नाहीत असे शेट्टी म्हणाले.

ज्या ताकदीने कारखानदार ऊस आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील, तितक्याच ताकदीने आंदोलन पुढे रेटले जाईल. शेतकऱ्यांच्या अंगावर बाऊन्सर घालण्याचा प्रयत्न केल्यास उसाच्या कांड्याने त्यांना फोडून काढण्यास मागे पुढे बघणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. जिल्हाच काय प्रसंगी राज्यात किंवा देशात जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तिथे आपण शेतकऱ्यांसाठी लढत राहणार असल्याची ठाम भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

पंधरा दिवस वाट बघण्यास शेतकरी तयार

सभेत राजु शेट्टी यांनी आपण आंदोलन लादले आहे का? इच्छे विरुद्ध आंदोलन करत आहे का? असा प्रश्न विचारताच उपस्थित शेतकऱ्यांनी नाही नाही म्हणत पाठिंबा कायम केला. मागील उसाचे चारशे रुपये घेण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट बघायला तयार आहात का? असे विचारताच शेतकऱ्यांनी हात उंचावत आठ दिवसच काय महिनाभर वाट बघायला लागले तरी चालेल पण ऊस दर आंदोलन चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार या वेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com