Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : धुळे लोकसभेतील चुरस अधिक वाढणार

Election Update : धुळे लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी चुरस अधिक वाढल्याची चिन्हे दिसत आहेत.

Team Agrowon

Dhule News : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची, अर्थात आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांची अंतिम पडताळणी सुरू झालेली आहे. धुळे लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी चुरस अधिक वाढल्याची चिन्हे दिसत आहेत.

विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे उमेदवारीची खात्री बाळगून आहेत. गेली दोन टर्म डॉ. भामरे हे खासदार आहेत. या काळात त्यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. डॉ. भामरे यांच्या संदर्भात पक्ष काय निर्णय घेणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात मात्र उमेदवारीची चुरस निर्माण झालेली आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांचे नाव उमेदवारीसाठी सध्या चर्चेत आहे. दहिते यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा क्षेत्र पिंजून काढले आहे. भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या रामजन्मभूमी प्रतिकृतीची रथयात्रा कमालीची चर्चेत राहिली. विशेष म्हणजे ही यात्रा अजूनही सुरू आहे.

गावागावांमध्ये यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. तरुण चेहरा असल्याने संघ परिवारातील तसेच भाजपतील प्रमुख नेत्यांचे लक्ष दहिते यांनी वेधून घेतले आहे. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यात दहिते सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेसतर्फे निवृत्त अधिकारी अब्दुल रहेमान यांच्या नावाची चर्चा सुरू असताना निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांची भाजपकडून चाचपणी सुरु झाली.

धुळे लोकसभा मतदार संघात आजवर प्रतापदादा सोनवणे वगळता अन्य कोणालाही धुळे लोकसभेत मतदारांनी स्वीकारलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. उमेदवारी ठरवताना वयाची मर्यादा हा निकषही महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे पाहणेही इथे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यासोबतच ‘एमआयएम’ देखील धुळे लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. धुळे शहर आणि मालेगाव शहरात एमआयएमचे आमदार असल्याने पक्षाला इथे लोकसभेसाठी संधी असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

SCROLL FOR NEXT