Co-operative Election : लोकसभेमुळे सहकारातील निवडणुकांचा खोळंबा

Loksabha Election Update : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत सहकारी व पणन संस्थांच्या निवडणुकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Election
ElectionAgrowon

Solapur News : सध्या प्रशासकीय पातळीवर फक्त लोकसभा निवडणुकीची लगबग दिसत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत सहकारी व पणन संस्थांच्या निवडणुकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार सहकारी बँका व पतसंस्था यांच्या निवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे.

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही रणधुमाळी चालणार आहे. मेनंतर जूनमध्ये पावसाळा सुरू होत असल्याने ऑक्टोबरपर्यंत सहकाराच्या निवडणुकांना वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची शक्यता असल्याने सहकारातील निवडणुकांना आता जानेवारी २०२५ चा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

Election
Loksabha Election : कृषी कामकाजावर आचारसंहितेचे सावट

दुष्काळ, पावसाळा, कोरोना अशा कारणांमुळे सहकारातील निवडणुकांचा कार्यक्रम विस्कळीत झाला होता. आता निवडणुकांचा कार्यक्रम पूर्वपदावर येत असल्याने सुरुवातीला लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकांमुळे सहकारातील निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सोलापुरातील समर्थ सहकारी बँक, विद्यानंद सहकारी बँक, कमला सहकारी बँक, सोशल सहकारी बँक या चार महत्त्वाच्या सहकारी संस्थांसह, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र. एक व दोन, जवळपास ११०० सहकारी संस्था निवडणुकीला पात्र आहेत. या संस्थांकडून प्रारूप मतदार यादी मागविण्याचे काम सुरू आहे. काही संस्थांनी यादी सादर केली आहे तर काही संस्था यादी सादर करू लागल्या आहेत. सध्या सुरू असलेला प्रारूप मतदार याद्यांचा टप्पा व लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसाठी शिल्लक असलेला कालावधी पाहता, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे जाण्याची दाट शक्यता आहे.

Election
Co-Operative Election Update : जिल्ह्यातील ११६० सहकारी संस्थांच्या लवकरच निवडणुका

बाजार समित्या, जिल्हा बँकही लांबणीवर

सोलापूर व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसरी मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ जुलैमध्ये पूर्ण होत आहे. सोलापूर बाजार समितीच्या या मुदतवाढीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना पाच वर्षांचा कालावधी झाला आहे.

या बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारी याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहे. सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेची निवडणूक दुष्काळाच्या कारणास्तव लांबणीवर ढकलण्यात आली आहे. बार्शी व सोलापूर बाजार समिती, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सोलापूर जिल्हा देखरेख संघ या महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुकादेखील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर जानेवारी २०२५ नंतरच होण्याची दाट शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com