Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain Update : धुळे, जळगावात पावसाचा फटका

Khandesh Rain News : खानदेशात पावसाचा फटका बसतच आहे. शुक्रवार (ता.१८) सायंकाळी व रात्री विविध भागात पाऊस, वादळ झाले.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पावसाचा फटका बसतच आहे. शुक्रवार (ता.१८) सायंकाळी व रात्री विविध भागात पाऊस, वादळ झाले. यात पिकांसह घरे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेल्याची स्थिती आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा भागात अर्धा तास वादळ व पाऊस झाला. साक्री तालुक्यातील वार्सा, पिंपळनेर भागात दुपारी अर्धा तास वादळी पाऊस झाला. काही भागात वादळी पावसात घऱगोठ्यांची हानी झाली अशी माहिती मिळाली. पशुधनाच्या चाऱ्याचे नुकसान होतच आहे. गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.

परिसरातील भाजीपाला पिकांची हानी झाली असून, पावसाने पिकात रोगराई, मर रोगाची समस्या येईल. यामुळे फवारणीचा जादा खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, धरणगाव, चोपडा, अमळनेर आदी भागातही पाऊस झाला. सुरवातीला सुसाट वारा होता. काही भागात वारा अधिक गतीने असल्याने केळीसह अन्य पिकांची हानी झाली.

वादळामुळे केळीची झाडे वाकली. काही भागात वीज बंद होती. सोयाबीन पिकाची हानी झाली आहे. तूर पिकही आडवे झाले आहे. तसेच शेतात पडून असलेला चारा, पिकांची नासाडी झाली आहे. सुमारे एक ते दीड तास पाऊस पाचोरा व परिसरात झाला. सकाळपासून ढगाळ, उकाडा अशी स्थिती होती. त्यात सायंकाळी पाऊस झाला.

कापसाची हानी, वीज बंद

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, धरणगाव आदी तालुक्यातील विविध भागात पावसाचा जोर अधिक होता. काही भागात एक तास तर काही भागात दोन तास पाऊस झाला. सर्वत्र पावसाने वेचणीवर आलेल्या कापसाची हानी होत आहे. सुरवातीला ढग जमून आले. लागलीच सुसाट्याचा वारा सुटला. वाऱ्याचा वेग वाढला.

यामुळे परिसरातील केळी पिकाची अधिक हानी झाली आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला आहे. अनेक गावांत वीजपुरवठा सुरळीत झालाच नाही. सततच्या पावसाने शेतांत पाणीच पाणी झाले आहे. शेतकरी चिंतेत आहेत.

दिवाळीचा सण पुढे आहे. यात कापूस पिकातून पैसा हाती येण्याचे दिवस असताना कापूस पीक आडवे होत आहे. सुमारे १० ते १२ हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीनची हानी यात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT