Voter Line Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : ‘धाराशिव’साठी पांगरीत मोठी चुरस

Election Voting Update : धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट ओमप्रकाश निंबाळकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अर्चना पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली.

Team Agrowon

Barshi News : धाराशिव लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट ओमप्रकाश निंबाळकर तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अर्चना पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. यात पांगरी पंचक्रोशीतही मोठी चुरस पहायला मिळाली. पांगरी येथील पाच बुथवर ६५.२५ टक्के मतदारांनी मतदान केले.

पांगरीत सकाळच्या सत्रात मतदानास वेगात आला होता. सकाळी अकरा वाजेपर्यंत १७, तर दुपारी तीनपर्यंत ४२.८१ टक्के मतदान झाले. त्यानंतर उन्हामुळे शुकशुकाट दिसून आला. उन्हाची तीव्रता कमी झाल्याने मतदान केंद्रांवर मतदारांच्या पुन्हा रांगा दिसू लागल्या.

बूथ क्रमांक ४५ मध्ये १११३ पैकी ६७४, ‘४६’ मधील १११५ पैकी ७७९, ‘४७’मधील १२४६ पैकी ८५४, ‘४८’ मधील ९५९ पैकी ५८५, ‘४९’ मधील ११७९ पैकी ७६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चिंचोलीत ८२५ पैकी ५७६ (६९.८१ टक्के), पांढरी येथे ९४४ पैकी ६७६ (७१.६१ टक्के), पिंपळवाडी येथे १०५० पैकी ७२५ (६९ टक्के),

ममदापूर येथे १०२२ पैकी ७५७(७४ टक्के) पिंपळगाव(दे) येथे ४६१ पैकी ३१९ (६९.१९ टक्के), उक्कडगाव येथे २३३४ पैकी १६१७(६९.२८ टक्के), घोळवेवाडी, ढेंबरेवाडी येथे ११२८ पैकी ७५४ (६६.८४ टक्के), गोरमाळे-टोणेवाडी येथे १६६७ पैकी १२६२ (७५.७० टक्के) मतदान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT