Protective Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Protective Farming : सुरक्षित शेती’ हाच धनश्रीचा ध्यास

Dhanashree Crop Solution : शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून काढणीपर्यंत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीडनाशके, तणनाशके, पीक संजीवक या गोष्टी पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहेत.

Team Agrowon

Crop Solution : शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून काढणीपर्यंत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीडनाशके, तणनाशके, पीक संजीवक या गोष्टी पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घेऊन गेली सोळा वर्षे पुण्यातील धनश्री क्रॉप सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
-----------------------------------
‘शेतकरी’ हाच केंद्रस्थानी ठेऊन २००७ मध्ये धनश्री क्रॉप सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरवात झाली. सुरक्षित उत्पादने, सुरक्षित शेतकरी आणि सुरक्षित अन्न ही त्रिसूत्री धनश्रीने सुरवातीपासून जपली. गुणवत्तापूर्ण निविष्ठांमुळे जमीन, पाणी यांचे प्रदूषण होत नाही. रसायन अवशेषमुक्त शेतीमाल निर्मितीला हातभार लागतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळल्यामुळे तो संतुष्ट होतो आणि दर्जेदार अन्नधान्यामुळे ग्राहकही समाधानी रहातो.

धनश्री क्रॉप सोल्यूशन्स आज जगभरातील नावीन्यपूर्ण, आधुनिक तंत्रज्ञानाधारित अन्नद्रव्ये भारतीय बाजारपेठेत विपणन करणारी आघाडीची कंपनी आहे. इतर कंपन्यापेक्षा धनश्री वेगळी आहे याचे कारण म्हणजे ‘पर्यावरण प्रथम’ आणि ‘समाधानी शेतकरी’ यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच हजारो यशस्वी शेतकरी धनश्रीच्या उत्पादनांचा वापर करून किफायतशीर शेती करीत आहेत. धनश्रीचे प्रशिक्षित प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या गरजेनुसार भेटून शंकांचे निरसन करतात.

‘धनश्री‘ची सुरवात ः
कंपनीचा गेल्या सोळा वर्षांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यामागे धनश्रीच्या संपूर्ण टीमचे अथक प्रयत्न आणि महेश दामोदरे यांचे अचूक मार्गदर्शन मिळाले आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग येथून पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा (PGDIE) केल्यानंतर महेश दामोदरे यांनी कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून Manufacturing Systems Engineering मध्ये पदव्युत्तर पदवी (MS) प्राप्त केली. काही वर्षे अमेरिकेत सॉफ्टवेअर क्षेत्रात काम केल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी भारतात परत येऊन कौटुंबिक व्यवसायात लक्ष देण्यास सुरवात केली. कृषीउत्पादन क्षेत्रातील हा प्रवेश काही ठरवून झाला नाही. संधी आली आणि इंजिनियरिंगमागे सोडून धनश्रीची सुरवात भागीदारीमध्ये सुरु झाली. मात्र त्यांच्यामधील हाडाचा इंजिनिअर त्यांना उपयुक्त ठरला. टीमसोबत काम करणे, टीमचे प्रशिक्षण, गुणवत्तेच्या कसोटीवर उतरलेली जगभरातील खते, बियाणे, पोषणद्रव्ये आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी कंपनीची ध्येयधोरणे ठरवणे, शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते प्रस्थापित करणे आणि पर्यावरणपूरक शेतीशी बांधिलकी जपणे, हे सर्व एक टीम लीडर म्हणून त्यांनी साध्य केले. या सगळ्या यशाचे श्रेय दामोदरे ‘धनश्री‘च्या टीमला देतात.

“सुरवातीची काही वर्षे डॉलर-रुपयांच्या दरामध्ये वारंवार होणाऱ्या चढ-उताराचे फटके बसत होते. शिवाय आपल्या बाजारपेठेत आमची उत्तम गुणवत्तेची उत्पादने तेव्हा तुलनेने महाग होती. शेतकऱ्यांना हे पटवून द्यावे लागले की आमची उत्पादने कमी मात्रेने वापरावी लागतात, त्यामुळे वरकरणी किंमत जास्त भासली तरी बचत होते आणि त्याचे अंतिम परिणाम उत्तम असतात,” असे दामोदरे सांगतात.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन ः
सर्वांना सुरक्षित अन्न, शेतीच्या बांधावर तज्ज्ञ सेवा, पर्यावरणाला प्राथमिकता, संघ भावना आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे या पंचसूत्रीवर धनश्री काम करते. पीक लागवडीपासून वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर पिकांचे संगोपन आणि काढणीपर्यंत शेतकऱ्याला सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीचे तज्ज्ञ सदैव तत्पर असतात. कुठल्या पिकासाठी, कुठल्या फवारणीसाठी, कुठल्या प्रकारची आणि पीक वाढीच्या कुठल्या अवस्थेसाठी कोणते उत्पादन वापरता येईल, असे सगळे बारकावे शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगण्यासाठी धनश्रीचे प्रतिनिधी कार्यरत असतात. या शिवाय वेळोवेळी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, चिली आणि स्पेन येथील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम; माती व्यवस्थापन, बायोस्टिम्युलंट इत्यादी विषयांवर चर्चासत्रे, कृषी प्रदर्शनात सहभाग
तसेच शेतकऱ्यांना परदेशात नेऊन तेथील तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. संशोधन आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांचा उत्तम दर्जा राखण्यातील सातत्य, शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य आणि मनापासून काम करणारा कर्मचारी वर्गामुळे धनश्रीच्या व्यवसायात भरघोस वाढ झाली.

विविध उत्पादनांची विक्री ः
सध्या कॉम्पो एक्स्पर्ट (जर्मनी), ट्रेडकॉर्प इंटरनॅशनल आणि इडाई नेचर (स्पेन), सोजिट्झ कॉर्पोरेशन(जपान) या आंतरराष्ट्रीय उत्पादकांसोबत भारतातील फिशफा बायोजेनिकस आणि सी सिक्स एनर्जी यांची उत्पादने धनश्रीमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. धनश्रीची उत्पादने व्यावसायिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. विशेष करून फळे व भाजीपाला निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ही उत्पादने अधिक लोकप्रिय आहेत. मराठवाड्यात त्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची योग्य बाजारपेठ ओळखणे गरजेचे आहे. आपल्या उत्पादनांचे ब्रॅडिंग, पारदर्शकता, सातत्य आणि पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन यांच्या जोरावर शेती यशस्वी करता येऊ शकते, असा त्यांना विश्वास आहे.
सध्या बीट, कारले, कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची या भाज्या; केळी, द्राक्ष, पेरू, पपई, संत्री ही फळे; रोपवाटिकेत झेंडू, शेवंती, जरबेरा आणि शोभेची झाडे तसेच कापूस, मका, सोयाबीन, संकरित भाजीपाला बियाणे याचबरोबरीने कापूस, मका, तूर, आले, कांदा अशा विविध पिकांसाठी धनश्रीच्या उत्पादनांची रेंज उपलब्ध आहे. भविष्यात स्पर्धा निश्चित वाढणार आहे, हे ध्यानात घेऊन आम्ही नर्सरी, भाजीपाला आणि फळे यांच्यापलीकडे जाऊन आमच्या उत्पादनांची रेंज वाढवणार आहोत. इतर पिकांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत,अशी माहिती दामोदरे यांनी दिली.


महत्त्वाचे पुरस्कार:
-इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉन्फरन्स - फास्टेस्ट ग्रोइंग इंडियन कंपनी एक्सलन्स ॲवॉर्ड.
- बेस्ट वॉटर सोल्यूबल फर्टिलायझर नोवल न्युट्रीयंट्स - अॅग्री बिझनेस समिट ॲण्ड अॅग्री अॅवॉर्ड्स, एबीएस २०२१.
- अॅग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्ड २०२१.
- ५० रूरल मार्केटिंग प्रोफेशनल्स अॅवॉर्ड.

धनश्री क्रॉप सोल्यूशन्सचे उपक्रम ः
- २५,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण.
- तीस पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा स्पेन शेती अभ्यास दौरा.
- चिली आणि पेरू देशामध्ये अकरा शेतकऱ्यांचा द्राक्ष पीक अभ्यास दौरा.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण.
- सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे थेट मार्गदर्शन.
-------------------------
संपर्क ः महेश दामोदरे, अमित खटोड (संस्थापक-संचालक), ९८५०५०२७३४
इमेल ः mahesh@plantnutrition.in

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhekale Land Dispute: ढेकाळेतील उपकेंद्राच्या जमिनीवरून नवा पेच

Nanded Farmer Crisis: खरीपापूर्वीच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

Raigad Unseasonal Rain: रायगड जिल्हा १२ तास अंधारात

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

Farmer Loss: मदनसुरी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात

SCROLL FOR NEXT