Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : पीकं विमा किंवा अनुदान उशीरा मिळालं तर शिव्या कृषीमंत्र्यालाच खाव्या लागतात, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

Aslam Abdul Shanedivan

Pune News: राज्यातील विविध जिल्ह्यातील पावसाच्या असामनतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाल्याने पंचनामे करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी सुरू आहेत.

यावरून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी, पाऊस कसाही होवो, अतिवृष्टी असो किंवा कमी, शिव्या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागता, असं वक्तव्य केलं आहे. तसेच पीकं विमा किंवा अनुदान उशीरा मिळालं तर कृषी मंत्र्यालाच विचारलं जातं. त्यामुळे रोज रात्री उचक्या लागतात, असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून पुण्यासह राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील विविध भागात पिकांचे नुकसान झाले आहे. पुण्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. यामुळे पंचनामे करण्याचे मुंडे यांनी दिले आहेत. याचबरोबर आर्थिक मदत देखील केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी मुंडे यांनी, राज्यातील इतर खात्यांपेक्षी कृषी खाते वेगळं असून येथे अनेकांच्या शिव्या खाव्या लागतात, असं म्हटलं आहे. कृषी खाते साधसुधं नाही. चांगलं झालं तर लोक विचारत नाहीत. पण वाईट झालचं तर खैर नाही. थेट शिव्यांची फुलंच वाहतात, असे मिश्कील वक्तव्य केलं आहे.

तर शेतकऱ्यांना कितीही दिलं तरी ते त्यांना कमीच असतं. कारण शेतकरी वर्षाचे बारा महिने निसर्गाशी लढतो. शेती करतो सोनं पिकवतो. पण शेतीशी निगडीत काहीही होवो शिव्या मात्र मलाच म्हणजे कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात. एखाद्या वेळी पीक विमा किंवा अनुदान उशीरा गेलं तरी थेट मलाच विचारणा होते. लोक म्हणतात कशाला कृषी मंत्री झालात? आता तर विरोधक देखील मला बोलत आहेत.

तसेच विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे. सरकारला लाडक्या बहीणींशिवाय काही दिसत नाही, अशी ओरड केली जात आहे. पण सरकारसाठी सर्वात आधी शेतकरी लाडका आहे. त्यानंतर सगळे.

यासाठीच सरकारकडून विविध योजना शेतकर्‍यांसाठी आणल्या जात आहेत. यामुळेच राज्यात पुन्हा आमचेच सरकार येईल. आमच्याबरोबर लाडकी बहीण, लाडका शेतकरी असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT