Dhananjay Munde and Anjali Damania Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde Corruption Case: धनंजय मुंडे यांना ‘क्लीन चीट’ नाही : दमानिया

Anjali Damania: धनंजय मुंडे यांना भ्रष्टाचार प्रकरणात कुठेही क्लीन चीट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी (ता. २५) पत्रकार परिषदेतून केले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : धनंजय मुंडे यांना भ्रष्टाचार प्रकरणात कुठेही क्लीन चीट मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शुक्रवारी (ता. २५) पत्रकार परिषदेतून केले.

कृषी निविष्ठा वितरण प्रकरणात उच्च न्यायालयाने तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना ‘क्लीन चीट’ दिली. त्यानंतर मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत आपली लढाई सुरू असल्याचे सांगत हे प्रकरण नीटपणे न्यायालयासमोर मांडण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने मुंडे यांच्या बाजूने निर्णय दिल्याचे सांगितले.

दमानिया म्हणाल्या, की दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शासनाच्या वकिलांनी हे प्रकरण मांडताना जे दोन शासन आदेश सादर केले ते वेगवेगळ्या विभागाचे असल्याचे सांगितले.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा यात कुठेही उल्लेख नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. ‘सत्यमेव जयते’ हे मुंडे यांना शोभत नाही. व्ही. राधा यांचा अहवाल न्यायालयासमोर मांडला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ हे सर्व मुंडे यांच्या पथ्यावर पडले आहे, असेही त्या म्हणाल्या. तसेच मुंडे यांना ‘क्लीन चीट’ दिल्याने पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT