Devendra Fadnavis CM Oath Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis CM Oath : फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Maharashtra Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांना शपथ दिली. यावेळी फडणवीस यांनी, 'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष शपथ घेतो की...' अशी घेतली. यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाती घेतला असून ते २१ वे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.

फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. तर एकनाथ शिंदे यांनी, 'हिंदूहृदय सम्राट आणि दिवंगत अनंत दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यपालांनी शिंदे यांचे स्वागत केल्यानंतर अजित पवार यांनी राज्याच्या सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर उपस्थितांमधून जोरदार जल्लोष झाला.

या भव्यदिव्य सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सितारामन, नितिन गडकरी यांच्यासह १४ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी भारतरत्न सचिन तेंडूलक सपत्नीक शपथविधीला हजर होते. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा देखील शपथविधीसाठी उपस्थित होते.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांच्या ३.० सरकारला सुरूवात झाली असून त्यांनी लगेच पदभार स्विकारला. त्यांनी मुख्यमंत्री दालनात जाऊन पदभार स्विकारला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करण्यात आली होती. तर महायुतीच्या शपथविधीसाठी अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

बुधवारीच भाजपच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली असून ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याआधी २०१४ ते मुख्यमंत्री बनले होते. यानंतर २०१९ मध्ये पहाटेचा शपथविधी घडवून आणत ते ८० तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर आता २०२४ मध्ये ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

आज राज्यामध्ये नव्या सरकारची स्थापना झाली असून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत.

शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी

दरम्यान, फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार शपथ घेतील हे निश्चित झाले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. पण फडणवीस यांनी बुधवारी रात्री त्यांची भेट घेऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती केली होती. यानंतर शिंदेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास राजी झाले. तर याबाबतचे शिफारस पत्र राजभवनात येथे जाऊन प्रधान सचिवांना देण्यात आले होते.

शरद पवार, उद्धव ठाकरेंची उपस्थित नाही

देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीसाठी शरद पवार यांना फोन करून निमंत्रण दिलं होतं. पण संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार, सुप्रिया सुळे या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित लावली नाही.

कार्यालयाच्या पाट्या बदलल्या

नव्या सरकारच्या शपथविधी झाल्याबरोबर मुख्यमंत्री दालानासह उपमुख्यमंत्री दालनाच्या पाट्या बदलण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी असलेली पाटी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी करण्यात आली आहे. तर फडणवीस यांच्या दालणावर उपमुख्यमंत्री शिंदे अशी पाटी लावण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या पाटील कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT