Development Work Agrowon
ॲग्रो विशेष

Development Work : बदलापूरमधील विकासकामांना खो

Development Work Update : वर्ष सरले तरी बदलापूरमध्ये मोठा गाजावाजा करत सुरू केलेली विकासकामे अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत.

Team Agrowon

Badlapur News : वर्ष सरले तरी बदलापूरमध्ये मोठा गाजावाजा करत सुरू केलेली विकासकामे अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. यात १०० बेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, रेल्वेचे होम प्लॅटफॉर्म, रेल्वेची तिसरी-चौथी मार्गिका, उड्डाण पूल, पाणी योजना,

तालुका क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, भुयारी गटार योजना, पनवेल हायवे अशा अनेक विकासकामांची भली मोठी यादी आहे. शहरासाठी निधीचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे विकासकामे ‘कोरडी’ असल्याने ही प्रतीक्षा संपणार कधी, असा सवाल बदलापूरकर आहेत.

बदलापूर पूर्वेकडील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीला तीस खाटा आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता शहरातील एकमेव सरकारी रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर ताण येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने या ठिकाणी १०० बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे जाहीर केले आहे. याचे काम सुरूदेखील करण्यात आले; मात्र मागील पाच वर्षे हे काम रखडलेल्या अवस्थेतच आहे.

बदलापूरची पाणीसमस्या दूर करण्यासाठी नगरोत्थानमधून जवळपास २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून, पाणीसमस्येवर तोडगा काढण्याचे काम सुरू झाले आहे, हेदेखील काम यावर्षी पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते; मात्र आता यासाठीदेखील बदलापूरकरांना नवीन वर्षाचीच वाट पाहावी लागणार आहे.

बदलापूरला एक सांस्कृतिक पर्यटनाच्या दृष्टीने वेगळी ओळख मिळावी या अनुषंगाने, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शहरालाच लागून असलेल्या वडवली येथील २२ एकर जागेत उभारण्यात येणार आहे. तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन २०२० मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर हे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल, असे आश्वासित करण्यात आले; मात्र तीन वर्षे होत असताना स्मारकाचे काम पूर्ण झालेले नाही.

नगरपालिका शासकीय इमारत खोळंबली

बदलापूर शहर नवीन गृहप्रकल्प आणि विकासकामांमुळे एक वेगळी ओळख निर्माण करत आहे; मात्र नगरपालिकेला स्वतःच्या प्रशासकीय इमारतीअभावी शहराचा कारभार दुबे रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीतून गेल्या अनेक वर्षांपासून हाकावा लागत आहे. दुसरीकडे स्टेशन परिसरात शासकीय जागेवर प्रशासकीय इमारत बांधणीचे कामदेखील मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेले आहे.

साधारण ४८ कोटी रुपयांचा निधी या इमारतीला मंजूर झाला आहे. ३० कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत; तर उर्वरित १५ कोटी रुपये पालिका प्रशासन देणार आहे. एकूण एक लाख वीस हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेल्या भव्य दिव्य प्रशासकीय इमारतीत, भविष्यातील महापालिकेच्या दृष्टिकोनातून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

होम प्लॅटफॉर्म लटकले

बदलापुरातून सव्वा लाख लोक हे रेल्वेने प्रवास करतात. साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी बदलापूर स्थानकात होम प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी भूमिपूजन केले होते; मात्र एक ना अनेक अडचणींमुळे होम प्लॅटफॉर्मचे कामदेखील अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच गेल्या पाच वर्षांपासून बदलापूर शहरात भुयारी गटार योजनेचे कामदेखील हाती घेण्यात आले आहे. यासाठी जवळपास ४५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT