Grape Orchard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Orchard Damage : अज्ञाताकडून द्राक्ष वेली तोडून बागेची नासधूस

Grape Rate : जोपूळ (ता. दिंडोरी) येथील सरपंच माधवराव उगले यांच्या द्राक्षबागेतील झाडे तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत, शेतातील साठ हजारांचे शेती साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.

Team Agrowon

Grape Damage In Nashik : जोपूळ (ता. दिंडोरी) येथील सरपंच माधवराव उगले यांच्या द्राक्षबागेतील झाडे तोडून मोठ्या प्रमाणात नुकसान करीत, शेतातील साठ हजारांचे शेती साहित्य चोरून नेल्याची घटना घडली.

सरपंच उगले यांची जोपुळ ते पिंपळगाव रोडवर गट क्रमांक १७१/२ मध्ये द्राक्षाची बाग आहे. गेल्या शनिवारी (ता. २०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी शेतातील द्राक्षबागेवर कुऱ्हाडीने घाव घालून मोठ्या प्रमाणात झाडे तोडली.

तसेच द्राक्षबागेत ठेवलेले अंदाजे २७ हजार पाचशे रुपये किमतीचे पावडर मारण्याचे ब्लोअर मशीनची आठ पितळी फुले, सुमारे ३२ हजार ५०० रुपये किमतीचा शंभर किलो क्षमतेचा वजन काटा असा मुद्देमाल चोरून नेला.

गेल्या आठ दिवसांपूर्वीदेखील उगले यांच्या शेतातील द्राक्षबागेतील काही द्राक्षाची झाडे कुऱ्हाडीने तोडून मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. त्यानंतर गेल्या शनिवारी पुन्हा द्राक्षांची ८० झाडे जमिनीपासून चार ते पाच इंचावर तोडून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

उगले यांनी तत्काळ वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार वणीचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी भादंवी कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT