Rice farming Agrowon
ॲग्रो विशेष

Rice farming : समुद्रामुळे भातशेतीची नासाडी

Coastal rice farming : उरण तालुक्यातील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणामुळे पाणी शेतात शिरले गेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाल्याने हजारो एकरांवरील शेती खाऱ्या पाण्यामुळे संकटात आली आहे.

Team Agrowon

Raigad news : रायगड जिल्ह्यातील पूर्व विभागातील खोपटा, बांधपाडा, पिरकोन, आवरे, गोवठणे या गावातील शेतीच्या संरक्षणासाठी असलेले बांधबंदिस्ती फुटले आहेत. त्यामुळे समुद्राचे पाणी शिरल्याने हजारो एकरावरील भातशेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

उरण हा अरबी समुद्राच्या लगत वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील आगरी, कराडी समाजाचे बहुतांश शेतकरी हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भातशेती करतात; तर काही मिठाचा व्यवसाय करत आहेत; परंतु परिसरातील औद्योगिकीकरणामुळे मिठाचा व्यवसाय संपुष्टात आला आहे. अशातच नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांवर वारंवार विविध संकटांची मालिकाच ओढावत आहेत.

अशातच खोपटा, बांधपाडा गोवठणे, आवरे परिसरातील पारंगी, सांगपाले, खार, काशी, पारंगी, रेवचा, वळा, खार या भागातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणामुळे पाणी शेतात शिरले गेले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाल्याने हजारो एकरांवरील शेती  खाऱ्या पाण्यामुळे संकटात आली आहे.

दुरुस्तीचे आश्वासन कागदावरच

उरणच्या पूर्व विभागातील हा भाग खारभूमी विभागाकडे येत आहे. या विभागाच्या पेण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उरण तालुक्यातील खोपटा खाडीकिनाऱ्यावरील फुटलेल्या बांधबंदिस्तीची पाहणी केली होती. त्या वेळी तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन कागदावरच राहिल्याने शेतकऱ्यांना वारंवार त्याची झळ बसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT