Gadhinglaj Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Gadhinglaj Sugar Factory : घोटाळा होऊनही गाळपावर परिणाम नाही; गडहिंग्लज साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडून दावा

Godsakhar Sugar Factory : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

sandeep Shirguppe

Gadhinglaj Sugar Factory : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा गोडसाखर कारखान्याच्या गळीत हंगामावर कोणताही परिणाम झालेला नसून तो सुरळीत सुरू आहे. हंगाम व ऊस बिलाविषयी पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर ऊस उत्पादकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी सोमवार (ता.१६) केले आहे.

अध्यक्ष पताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्यातून मिळालेल्या अर्थसहायामुळे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. दररोज गडहिग्लज साखर कारखान्याचे २ हजार ५०० टन ऊसाचे गाळप सुरू आहे. साखरेचे उत्पादनही सुरळीत आहे." असे पताडे यांनी सांगितले.

पताडे पुढे म्हणाले, "कारखान्यातील गैरव्यवहार संदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर उत्पादक, वाहतूकदार व तोडणी यंत्रणेने विश्वास ठेवू नये. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारे विचलीत होवू नये. या प्रकरणाचा कोणताही परिणाम कारखाना अथवा गळीत हंगामावर होणार नाही. उत्पादकांनी विश्वासाने कारखान्याला ऊस पाठवत आहेत. म्हणूनच कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळाने योग्य नियोजन केले आहे". असेही पताडे म्हणाले.

'याचबरोबर आर्थिक नियोजनही पूर्ण असून वेळेवर म्हणजेच १५ दिवसांनी उसाची बिले जमा करण्यात येणार आहेत. तोडणी व वाहतूकदारांची बिलेही वेळेवर देण्यात येणार आहेत. त्यामुळे उत्पादकांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे' आवाहन अध्यक्ष पताडे यांनी केले.

साखर कारखाना घोटाळ्यावर पहिलीच कारवाई

बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये ११ कोटी ४२ लाख ६४ हजारांचा घोटाळा समोर आला. तसेच आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमिता आणल्याप्रकरणी अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार यांचा समावेश आहे. अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरले नसून एवढ्या मोठ्या रकमेचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT