Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : अतिवृष्टी, अवर्षणाने हिरावला घास; तरीही दुष्काळी यादीत समावेश नाही

Drought Update : या महसूल मंडलामध्ये आधी अतिवृष्टी होऊन पिके खरडल्या गेली. नंतर ३० दिवस पावसाचा खंड, परतीच्या पावसाची हुलकावणी यामुळे उत्पन्नातील घट मोठी झाली.

Team Agrowon

Washim News : या महसूल मंडलामध्ये आधी अतिवृष्टी होऊन पिके खरडल्या गेली. नंतर ३० दिवस पावसाचा खंड, परतीच्या पावसाची हुलकावणी यामुळे उत्पन्नातील घट मोठी झाली. ५० पैशांपेक्षा आणेवारी कमी तरीही इंझोरी महसूल मंडल दुष्काळ यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. महसूल मंडलावर अन्याय केल्याचा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत.

शासनाच्या वतीने जिल्ह्यातील महसूल मंडले दुष्काळ सदृश म्हणून जाहीर केले. मात्र यामध्ये इंझोरी महसूल मंडलाचे नाव वगळल्याने मंडलातील शेतकरी संताप व्यक्त करीत असून, मंडलाचा समावेश यादीमध्ये करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामामध्ये आधी पावसाने जोरदार हजेरी लावून अंकुरलेले बियाणे, कोमल अवस्थेत असलेले पीक अतिवृष्टीमुळे खरडून गेले.

यामध्ये महसूल मंडलातील शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे पुन्हा पेरणी करून पिके बहरू लागली असता ३० दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे सर्व पिके जाग्यावरच कोमेजल्या गेली. या वेळेस मात्र परतीच्या पावसाचा आधार मिळाला पाहिजे होता.

मात्र परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे इंझोरी महसूल मंडलातील गावांमधील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना फटका बसल्यामुळे पीक उत्पादनात कमालीची घट झाली. महसूल आणेवारीसुद्धा ५० पैशांपेक्षा कमी आली. या सर्व नोंदी शासन दरबारी असतानाही इंझोरी महसूल मंडलाचा दुष्काळग्रस्त मंडलांच्या यादीत समावेश करण्यात आला नाही.

त्यामुळे या मंडलातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली असून, इंझोरी महसूल मंडलाचा दुष्काळी मंडलांच्या यादीत समावेश करण्याची मागणी इंझोरी, दापुरा खुर्द, दापुरा बुद्रुक, म्हसनी, चौसाळा, तोरणाळा, उंबरडा, अजनी, जामदरा घोटी, भोयनी, खापरी, खंडाळा, पारधी तांडा, जामदरा, कवठळ, धानोरा आदी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT