Drought Update : दुष्काळसदृश मंडलांतून ‘त्या’ १३ मंडलांना वगळले

Drought Condition : यंदा (२०२३) जून ते सप्टेंबर या कलावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.
Drought
Drought Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदा (२०२३) जून ते सप्टेंबर या कलावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

परंतु परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील १३ महसूल मंडलांत या कालावधीत ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडलेला असूनसुद्धा या मंडलांना दुष्काळसदृश परिस्थितीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Drought
Drought Condition : नांदेडात २५ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

परभणी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सरासरी ५२२.५ मिलिमीटर (६८.६ टक्के) पाऊस झाला आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (ता. १०) काढलेल्या शासन निर्णयातील निकषानुसार जिल्ह्यातील सर्व ५२ महसूल मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३९ मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे जाहीर करून सलवती लागू करण्याचे घोषित करण्यात आले आहे.

Drought
Village Development : संत्रा बागेसह आदर्श शाळेसाठी नाव मिळवलेले बोर्डी गाव

१३ मंडलांतील जून ते सप्टेंबरची पाऊस स्थिती (मिलिमीटर)

मंडल सरासरी पर्जन्यमान प्रत्यक्ष पाऊस टक्के

टाकळी कुंभकर्ण ८११.० ४९४.५ ६१.०

दूधगाव ७३३.४ ५२५.६ ७१.७

वाघी धानोरा ७३३.४ ३७७.४ ५१.५

मोरेगाव ७३७.३ ५४४.१ ७३.८

रामपुरी ७३२.२ ३७६.० ५१.४

ताडबोरगाव ७३२.२ ६०३.४ ८२.४

कासापुरी ७३९.५ ४३८.४ ५९.३

वडगाव ६७९.६ ४४२.९ ६५.२

शेळगाव ६७९.६ ४०७.३ ५९.९

पिंपळदरी ७२५.७ ३०३.८ ४१.९

रावराजूर ७३८.९ ५५५.१ ७५.१

पेठशिवणी ७३८.९ ५४०.० ७३.१

कावलगाव ८०७.० ४९७.५ ६१.६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com