Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : साताऱ्यात टँकर स्थिती ‘जैसे थे’

Water Tanker : जिल्ह्यात मागील आठवड्यात अनेक भागांत दमदार पाऊस झाला असला, तरी टंचाई मात्र कमी झालेली नाही.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात मागील आठवड्यात अनेक भागांत दमदार पाऊस झाला असला, तरी टंचाई मात्र कमी झालेली नाही. जिल्ह्यात अजूनही ९१ टँकरद्वारे ७७ गावे ३८१ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात अपुऱ्या पावसाचा फटका कायम आहे. पावसाअभावी टंचाई परिस्थिती वाढ होत आहे. जिल्ह्यातील ८० हून अधिक मंडलांत २१ दिवसांहून अधिक पाऊस झालेला नाही. यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. पावसाच्या गैरहजेरीमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे.

यामुळे टँकरच्या मागणीत वाढ होत असल्याने टँकरची शतकाकडे वाटचाल सुरू आहे. मागील सप्ताहात पाऊस होऊनही टंचाई परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पावसामुळे अवघे टँकरच्या संख्येत सहाने घट झाली आहे.

सध्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील ७७ गावे व ३८१ वाड्यावस्त्यांवरील एक लाख २५ हजार ९०२ लोकांना ९१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ७६ हजार ९५५ पशुधनही या पाणीटंचाईने बाधित आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत आहेत. माण तालुक्यात ५७ टॅंकरद्वारे ४० गावे ३२१ वाडीवस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.

खटाव तालुक्यात १४ टँकरद्वारे २१ गावे २४ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात १२ टॅंकरद्वारे १० गावे ३६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात आठ टँकरद्वारे सहा गावांत पाणीपुरवठा केला जात आहे. पश्‍चिमेकडील तालुक्यात पावसाअभावी टंचाई झळा बसत असून, पिण्याच्या पाण्याच प्रश्‍न नसलातरी पिकांना पाण्याची गरज भासत आहे. पावसावर अवलंबून असलेली पिके सुकू लागली आहेत.

विहिरींचे अधिग्रहण...

संरक्षित पाण्यासाठी प्रशासनाकडून १८ विहीर व ३२ बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यात चार विहिरी व १३ बोअरवेल, खटाव तालुक्यांत चार विहिरी व १५ बोअरवेल, फलटण तालुक्यात दोन विहिरी, कोरेगाव तीन व वाई तालुक्यात पाच विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पावसाने अशीच दडी मारली तर टॅंकरची संख्या लवकरच शतकाकडे जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT