Deputy CM Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Deputy CM Ajit Pawar : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

Soybean Farmers : राज्य पणन विभागाने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या पदरात निराशा पडली. यावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन खरेदीवर चर्चा झाल्याची माहिती दिली.

Dhananjay Sanap

Soybean Procurement Crisis : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होईल, अशी कुठली बाब आम्ही सरकारच्या वतीने होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंगळवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने २४ दिवसांची मुदत वाढ दिल्याची चर्चा होती. परंतु राज्य पणन विभागाने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांच्या पदरात निराशा पडली. यावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन खरेदीवर चर्चा झाल्याची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, "देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात केलं आहे. काही बाबतीत सोयाबीन खरेदी राहिलं आहे. परंतु व्यापारी साठे करून खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जातात आणि सोयाबीन शिल्लक राहिल्याचं दाखवतात. याबाबतही मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली." असंही अजित पवार म्हणाले.

सोयाबीन खरेदीची अंतिम मुदत ६ फेब्रुवारी होती. त्यामुळे राज्यातील खरेदी केंद्र बंद करण्यात आले. परंतु अद्यापही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असल्याने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. यावर अजित पवारांनी शेतकऱ्यांचं नुकसान होईल, असा निर्णय राज्य सरकार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री म्हणाले, "सोयाबीन खरेदी गेल्या महिन्यात बंद होणार होतं. परंतु त्याला मुदत वाढ देण्यात आली. आताही कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेईल." अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवारांनी दिली.

दरम्यान, सोयाबीन खरेदीत सुरुवातीपासूनच सावळगोंधळ पाहायला मिळाला. खरेदी केंद्र उशिराने सुरू करण्यात आली. तसेच नोंदणी करूनही शेतकऱ्यांना वेळेवर खरेदीसाठी मेसेज पाठवण्यात आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री केली, त्या शेतकऱ्यांचे पेमेंट अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही.

राज्य सरकारने ११ लाख टन सोयाबीन खरेदी केलं आहे. परंतु खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही. राज्य सरकारने १४ लाख १३ हजार टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT