Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election : ‘छत्रपती’ची निवडणूक तुल्यबळ समजूनच लढतोय

Cooperative Sugar Mill Election : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशाकाकी पवार यांनी खताळपट्टा व भवानीनगर येथे मतदान केले.

Team Agrowon

Baramati News : माझ्या कुटुंबातील अनेक जण श्री छत्रपती कारखान्याचे सभासद आहेत. बारामती, इंदापूर तालुक्यांतील ५३ गावांच्या दृष्टीने हा कारखाना अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी लक्ष घातले. कोणतीही निवडणूक आम्ही एकतर्फी मानत नाही. ही निवडणूक तुल्यबळच आहे, असे समजून आम्ही लढत आहोत, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान झाले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशाकाकी पवार यांनी खताळपट्टा व भवानीनगर येथे मतदान केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की पृथ्वीराज जाचक व जय भवानी माता पॅनल यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवण्याची धमक आहे. त्यांना सर्वांनी मतदान करावे.

वळिवाचा पाऊस सध्या पडत आहे. हवामान विभागाने राज्यात १२ ते १३ जिल्ह्यांमध्ये ‘हाय अलर्ट’ दिला आहे. उन्हाळी पिकांचे यामुळे नुकसान होत आहे. नुकतीच विभागीय आयुक्तांबरोबर मी खरीप हंगामासंदर्भात बैठक घेतली आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या पावसामुळे जर काही नुकसान झाले असेल तर त्वरित नियमाअंतर्गत नुकसान भरपाई द्या, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असेही या वेळी ते म्हणाले.

‘ते’ पुस्तक मी वाचले नाही

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासंदर्भात माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, ‘हे पुस्तक मी पाहिले नाही आणि वाचलेदेखील नाही. या संदर्भात मला काही बोलायचे नाही,’ अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT