Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

‘गोधन’ प्रदर्शनाचे आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सकाळ-ॲग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रासह पशुपालक शेतकऱ्यांची उत्सुकता लागून असलेल्या ‘गोधन -२०२२’ प्रदर्शनाचे (Godhan Exhition) उद्घाटन शुक्रवारी (ता. २७) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होत आहे. सकाळ-ॲग्रोवन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) यांच्या संयुक्त उपक्रमातून पुणे कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर साकारलेले हे अभिनव प्रदर्शन तीन दिवस सुरू राहणार आहे.

देशातील जातिवंत तसेच दुर्मिळ दुधाळ गोवंश एकाच ठिकाणी पाहण्याची संधी ‘गोधन’मुळे मिळते आहे. आज सकाळी साडेसात वाजता होत असलेल्या विशेष उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खा.गिरीश बापट, आ. सिद्धार्थ शिरोळे व किशोर दराडे, कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील तसेच कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय पानसरे व दत्तात्रय उगले उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील शिवाजीनगर नवीन एसटी बसस्थानकासमोरील ‘देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा’त आजपासून २८ मेपर्यंत चालणारे ‘गोधन’ म्हणजे वैविध्यपूर्ण माहितीचा खजिनाच असेल. ‘कन्हैया अॅग्रो’, ‘चितळे डेअरी’ व ‘बारामती अॅग्रो’ हे या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. गोवंश, गोपालनाची शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लालकंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश बघण्यास मिळतील.

‘गोधन’मध्ये यंत्रे-अवजारे, प्रात्यक्षिके

नावीन्यपूर्ण पशुपालन तंत्र, दूध प्रक्रिया उद्योग, पशूखाद्य निर्मिती व चारा पिके या विषयांवरील माहितीबरोबरच यंत्रे-अवजारे, प्रात्यक्षिके ‘गोधन’मध्ये बघण्यास मिळतील. प्रदर्शनस्थळी गोपालक व शास्त्रज्ञांची अभ्यासपूर्ण व्याख्यानेही होणार आहेत. राज्याच्या पशुपालक, शेतकरी, पशूतज्ज्ञ, गोशाळांसह सहकारी व खासगी डेअरी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT