Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

'त्या' साखर कारखान्यांचे हार्वेस्टर ताब्यात घ्या; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे साखर आयुक्तांना आदेश

टीम ॲग्रोवन 

राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर गाळप पूर्ण झालेल्या कारखान्यांचे हार्वेस्टर (Sugar Cane Harvester) ताब्यात घेण्याचे आदेश गुरूवारी (ता.७) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी साखर आयुक्तांना (Sugar Commissioner) दिले आहेत. ताब्यात घेतलेले हार्वेस्टर गाळप सुरू असलेल्या कारखान्यांना भाडे तत्त्वावर देण्याचे आदेशही पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील ऊस गाळप हंगाम (Maharashtra Sugar Cane Crushing season) अंतिम टप्प्यात आला असून अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी शेतात उभा आहे. अतिरिक्त उसाच्या (Maharashtra Excess cane) गाळपाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

यावेळी पवार म्हणाले की, राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे यंदा राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उसतोड मजूरांच्या (Sugar Cane Cutters) कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे राज्यातील ज्या साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे, अशा कारखान्यांचे हार्व्हेस्टर मशीन ताब्यात (Harvester Custody) घेऊन गाळप सुरू असणाऱ्या कारखान्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात यावे, असे आदेश पवार यांनी साखर आयुक्तांना दिले आहेत.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या आहेत. अतिरिक्त उसामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. तसेच पुढील वर्षी सुध्दा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामाचेही योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, अतिरिक्त उसाच्या गंभीर प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, वेस्टर्न शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच

Panchaganga River : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी गांभिर्य कोणालाच नाही? पाहणीवेळी अधिकारीच अनुपस्थित

Vilayati tamarind Processing : विलायती चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Maize Market : खानदेशात मका आवकेत घट, दरात किंचित वाढ

Green Manuring : जमिनीला आच्छादन अन् उन्हाळ्यात सावलीही

SCROLL FOR NEXT