Ajit Pawar agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर नको; अजित पवारांकडून साखर कारखानदारांना सूचना

sandeep Shirguppe

Sugar Factory Owners Kolhapur : ‘साखर कारखान्यांनी आर्थिक शिस्त पाळावी. कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊ नये’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता.०९) केले. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.

पवार पुढे म्हणाले की, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्सची टांगती तलवार दूर केली आहे. एफआरपीपेक्षा जादा दिलेला दर इन्कम टॅक्समधून कमी करावा, अशी मागणी शहा यांच्याकडे करणार असल्याचे पवार यांनी सांगितलं.

पवार म्हणाले, ‘प्रत्येक कारखान्याला एफआरपी देणे बंधनकारक आहे. एफआरपी देताना नाकीनऊ आलेल्या कारखान्यांच्या मानगुटीवर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती. हा प्रश्‍न राज्यासह देशातील सर्वच साखर कारखान्यांना भेडसावत होता. याबाबत साखर कारखान्यांकडून घेतला जाणारा कर रद्द व्हावा, यासाठी वीस वर्षांपासून आम्ही लढा दिला असल्याचे पवार यांनी सांगितलं.

तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. चर्चेतून हा कर भरण्यास मुदतवाढ मिळत होती. मात्र त्याची टांगती तलवार आमच्या डोक्यावर असायची. हाच विषय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी कारखान्यांच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार काढून टाकली आहे. त्यामुळे आता कारखान्यांना नोटीस येत नाहीत. असेही पवार म्हणाले.’

‘आचारसंहिता दोन दिवसांत’

‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन-तीन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे,’ अशी माहितीही पवार यांनी या कार्यक्रमात दिली.

बँकेत बहुपक्षीय सत्ता कौतुकास्पद : अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा बॅंकेने आर्थिक शिस्त पाळली आहे. भविष्यातही बँकेचा दर्जा ढासळू नये, यासाठी संचालकांसह कर्मचाऱ्यांनीही खबरदारी घेतली पाहिजे. बँकेत बहुपक्षीय सत्ता असून, यामध्ये कोणतेही राजकारण आणले जात नाही, हे कौतुकास्पद आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ ग्राहकांच्या हितासाठी काम करीत आहेत. चांगली सेवा देण्यासाठी शाखा वाढविल्या पाहिजेत.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT