Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : ‘आजरा’ची ३१ जानेवारी अखेरची ऊसबिले जमा

व्यवस्थापनाने चार लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

Team Agrowon

Kolhapur Aajra News : येथील आजरा शेतकरी साखर कारखान्याच्या (Farmers Sugar Factories) १६ ते ३१ जानेवारीदरम्यान गाळप झालेल्या ४९ हजार ८१५ टन उसाची तीन हजार रुपयांप्रमाणे होणारी रक्कम १४.७५ कोटींची ऊस बिले (Sugarcane Bill) विनाकपात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी दिली.

आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत तीन लाख ३६ हजार टन ऊसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उताऱ्याने ४,०६,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

व्यवस्थापनाने चार लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण अतिपावसामुळे ऊस उताऱ्यामध्ये १० टक्के घट झाली. तसेच, तोडणी वाहतूक यंत्रणा काही अंशी कमी पडली. त्यामुळे ठरवलेले उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही.

ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत अदा करण्याचे नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याने केलेले आहे.

त्याचप्रमाणे चालू लागवड हंगामासाठी ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयात सुरू आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये गळितास आलेल्या ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले लवकरच अदा करण्यात येणार आहे.

कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारूती घोरपडे, सुनिता रेडेकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT