Water Projects Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सावनेर तालुक्यातील प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट

Water Shortage : सावनेर तालुक्यातील प्रमुख १२ धरणांतील जलसाठा बराच कमी झाला आहे. फक्त एकच जलाशयात पन्नास टक्क्यांच्या वर जलसाठा असून उर्वरित अकरा जलसाठ्यात जलसाठा अत्यल्प आहे.

Team Agrowon

Nagpur News : सावनेर तालुक्यातील प्रमुख १२ धरणांतील जलसाठा बराच कमी झाला आहे. फक्त एकच जलाशयात पन्नास टक्क्यांच्या वर जलसाठा असून उर्वरित अकरा जलसाठ्यात जलसाठा अत्यल्प आहे.

तापमानाचा पारा थेट ४० अंशापर्यंत जाऊन पोहचला आहे. परिणामी अवघ्या सावनेर तालुक्यात उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेसोबत तालुक्यातील धरणाच्या जलपातळीत मोठी घट झाली आहे. सावनेर तालुक्यात पाटबंधारे उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी तालुक्यांतील महत्त्वाच्या १२ प्रकल्पांत असणारा जलसाठा उन्हाचा जोर वाढल्याने दिवसेंदिवस कमी होत आहे.

मे अखेरीस १२ जलशयांपैकी फक्त खेकरानाला जलाशयात ६५ टक्के पाणीसाठा असून उर्वरित ११ जलाशयात साठा अत्यल्प आहे. यावर्षी सावनेर तालुक्यात सरासरी ९४५ मी.मी.इतका पाऊस पडला. त्यामुळे साधारण सप्टेंबर महिन्यात सर्वच बारा जलाशये तुडूंब भरले होते. त्यानंतर पावसाचा जोर थांबला.

त्यामुळे सर्वच बारा प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत वाढ न होता पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली. नळयोजना, मासेमारी व्यवसाय, जलाशयावर अवलंबून असलेल्या शेतीला याचा फटका बसला. वन्यप्राणी, पाळीव प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशी भयावह स्थिती जलाशयातील घटत्या पाण्याच्या पातळीमुळे निर्माण झाली आहे.

वन्यप्राण्याची धाव मानव वस्तीकडे

उन्हाची चाहूल लागताच जंगली जनावरे पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करीत असतात. या जलाशयात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करीत असून केळवदसह बडेगाव परिसरात वाघाने पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

१८ मे २०२४ पर्यंत जलाशयातील जलसाठा

प्रकल्पाचे नाव टक्केवारीत उपलब्ध जलसाठा

केसरनाला मध्यम प्रकल्प ४३.२९

उमरी मध्यम प्रकल्प ३६.९०

कोलार मध्यम प्रकल्प ३४.१२

खेकरानाला मध्यम प्रकल्प ६५.००

माहरकुंड लघू प्रकल्प ११.३६

नागलवाडी लघू प्रकल्प २०.००

कान्हादेवी लघू प्रकल्प १४.६८

सुवरधरा लघू प्रकल्प २३.६६

भागीमहारी लघू प्रकल्प १५.४९

रायबासा लघू प्रकल्प १८.२३

खुमारीनाला लघू प्रकल्प ४५.६७

नांदा लघू प्रकल्प ९.१४

सावनेर उपविभागातील येणाऱ्या सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी या तालुक्यांतील चार मध्यम प्रकल्पातील तसेच आठ लघू प्रकल्पातील जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पाणी काटकसरीने वापरावे.
नरेंद्र निमजे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, सावने

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief : नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी एनडीआरएफमधून राज्यांना निधी कसा मिळतो?

PM Modi: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ४२ हजार कोटींची भेट, दोन दिवसांत मोठी घोषणा

Farm Mechanization : नांदेडला कृषी यांत्रिकीकरणाचा खर्च केवळ ३० लाख खर्च

Rohit Pawar: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्यावे: रोहित पवार

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा

SCROLL FOR NEXT